* शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा

शिवसेनेच्या दुष्कळी दौ-याला आजपासून जालना जिल्ह्यातून सुरूवात झाली. यावेळी शिवसेनेने आयोजित केलेल्या सभेत शिवेसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची मागणी केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार पीक कर्जाच्या वसुलीला किती काळ स्थगिती देणार? जनता कित्येक वर्षांपासून दुष्काळ सहन करीत आहे. या मराठवाड्याचे वाळवंट झाले आहे. आम्हाला पीक कर्ज माफ करून हवे आहे. त्यासाठी आम्ही भीक मागणार नाही. आम्हाला आमचा हक्क हवा आहे. जोपर्यंत पाण्याची व्यवस्था सरकार करत नाही तोपर्यंत जनतेकडून एकाही पैशाची वसुली होता कामा नये. २०१२ साली महाराष्ट्र भारनियमनमुक्त करू असे आश्वासन आघाडी सरकारने दिले होते. परंतु, अजूनही वीज पुरवठा विस्कळीतचं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष सत्तेसाठी आपापसात भांडणे करीत आहेत जनतेसाठी नाही असे म्हणत त्यांनी आघाडी सरकारवर टीकाही केली. त्याचप्रमाणे सोनिया गांधी यांना टार्गेट करत हिंमत असेल तर सोनिया गांधींनी अशाप्रकारची सभा मराठवाड्यात घेऊन दाखवावी असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी केले.