News Flash

असा आहे उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा

महाराष्ट्रात बुधवारी मोदी-ठाकरे ‘सामना’ रंगणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवर ९ जानेवारी रोजी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते दुष्काळग्रस्त भागांची पहाणी करणार आहेत. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा महत्वपूर्ण व लक्षवेधी ठरणार आहे. दुष्काळग्रस्त गावांची पाहणी, तेथील शेतकऱ्यांशी संवाद, दुष्काळग्रस्तांना मदत असे उद्धव यांच्या दौऱ्याचे स्वरूप असेल. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत दुष्काळग्रस्तांना १०० ट्रक पशूखाद्य, धान्य, पिण्यासाठी पाण्याचे टँकर या वस्तूचं वाटप शिवसेनेकडून केलं जाण्याची शक्यता आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेही १२ जानेवारीपासून दुष्काळी भागाच्या पाहणीस जाणार आहेत.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार असून याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनाच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. भाजप-शिवसेनेत सुरू असलेल्या शह-काटशहाच्या राजकारणात मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे दुष्काळ पाहणीवर निघत असल्याने महाराष्ट्रात बुधवारी मोदी-ठाकरे ‘सामना’ रंगणार आहे.

                         असा आहे उद्धव ठाकरेंना मराठवाडा दुष्काळ दौरा

– सकाळी ९ वाजता औरंगाबादमध्ये आगमन
– सकाळी १० वाजता बीड येथे हेलिकॉप्टरने आगमन
– बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात पशूखाद्य वाटप
– सकाळी १२ वाजता उद्धव ठाकरेंची बीडमध्ये जाहीर सभा
– १ वाजता गेवराईकडे प्रस्थान
– १ वाजून ३० मिनीटांनी गेवराई येथे माजी आमदार बदामराव पंडीत यांच्याकडे भोजन
– दुपारी 2 वाजून १५ मि. जालन्याकडे गाडीने प्रस्थान
– ३ वाजून ३० मि. जालन्यात दाखल
– जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना अन्न-धान्य वाटप
– संध्याकाळी ४ वाजता परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी आणि दुष्काळग्रस्तांना मदत, पिण्याच्या पाण्याचे टँकर वाटप
– संध्याकाळी ७ वाजता औरंगाबादहून मुंबईकडे परतीचा प्रवास

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 12:12 pm

Web Title: udhav thackeray visit marathwada on 9 jan
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 खुशखबर! लवकरच मुंबईवरुन नाशिक- पुण्याला जाता येणार लोकलने
3 देशभरातील वाहतूक कर्मचारी आजपासून दोन दिवस संपावर
Just Now!
X