28 May 2020

News Flash

भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईसाठी ग्रामस्थांचे उपोषण

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दहा दिवसात कारवाईचे आश्वासन शासकीय अधिकाऱ्याांनी दिले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील उमरे ग्रामपंचायतीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दहा दिवसात कारवाईचे आश्वासन शासकीय अधिकाऱ्याांनी दिले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुरु केलेले उपोषण शुक्रवारी  तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले. या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील स्मशानभूमी, शौचालय अनुदान रक्कम, ग्रामपंचायत इमारत दुरुस्ती, कृषी अवजारे खरेदी, घरकुल योजना इत्यादी विविध योजनांमध्ये २०११ ते २०१४ या कालावधीत भ्रष्टाचार झाल्याची स्थानिक ग्रामस्थांची तक्रार आहे. या संदर्भात चौकशी सुरु होताच न झालेल्या कामांचे पैसे आधीच काढून घेण्यात आले, अशी महत्वाची कामे संबंधित ठेकेदारांनी सुरु केली आहेत. म्हणून या संदर्भात दोषींवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी सर्वश्री महेंद्र जाधव, चंद्रकांत बाईत, गणपत बसवणकर, प्रकाश मोहिते इत्यादींच्या नेतृत्वाखाली स्थानिक ग्रामस्थ गेल्या बुधवारपासून उपोषणाला बसले होते. गट विकास अधिकारी सरिता पवार, विस्तार अधिकारी पी.एन.सुर्वे इत्यादींनी गेले दोन दिवस त्यांच्याशी चर्चा केली. मात्र या संदर्भात तातडीने कारवाईची मागणी अधिकाऱ्यांनी मान्य न केल्याने त्यातून तोडगा निघू शकला नव्हता. अखेर आज पोलीस निरीक्षक मनोहर चिखले यांनी मध्यस्थी करत ज्येष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी उपोषणकर्त्यांची चचा्र घडवून आणली. त्यामध्ये दोषी व्यक्तींवर दहा दिवसात कारवाईचे आश्वासन शासकीय अधिकाऱ्याांनी दिल्यामुळे ग्रामस्थांनी सुरु केलेले उपोषण आज तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2016 3:06 am

Web Title: umare gram panchayat fraud case ratnagiri
Next Stories
1 सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची मोबाइल एटीएम व्हॅन कार्यरत
2 कामगार नेत्यावर हल्लाप्रकरणी सक्तमजुरी
3 हापूस आंब्यावरील उष्णजल प्रक्रियेबाबत अनिश्चितता कायम
Just Now!
X