शहर सहकारी बँकेच्या निवडणुकीतील सत्ताधारी आधुनिक पॅनेलला हवे असलेले ‘पतंग’ हे चिन्ह निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी अखेर बुधवारी गोठवले. त्याऐवजी त्यांना ‘छत्री’ हे चिन्ह देण्यात आले असून, या पॅनेलला हा मोठाच धक्का मानला जातो. विरोधी अंकुश पॅनेलला त्यांच्या मागणीनुसार ‘घंटा’ हे चिन्ह देण्यात आले.
निवडणुकीतील स्वतंत्र उमेदवार प्रमोद आष्टेकर व किशोर सोनग्रा यांनी आधुनिक पॅनेलच्या पतंग या चिन्हाला आक्षेप घेतला होता. निर्धारित कार्यक्रमानुसार बुधवारी उमेदवारांचे चिन्हवाटप झाले. आधुनिक पॅनेलला त्यांच्या मागणीनुसार पतंग हे चिन्ह मिळाले तर नाहीच, मात्र ते चिन्हच गोठवण्यात आले आहे. चिन्हवाटपाच्या वेळीच हौसारे यांनी हा निर्णय जाहीर केला.
बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या दि. २६ला होणार आहे. संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात उतरले असून प्रा. मुकुंद घैसास व सुभाष गुंदेचा यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आधुनिक व प्रा. मोहन कामत, संचालक आसाराम कावरे यांच्या नेतृत्वाखालील अंकुश पॅनेल यांच्यात सरळ लढत आहे. मात्र विरोधी मंडळाला सर्व जागांवर उमेदवार देता आले नाहीत, त्यांनी १३ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. याशिवाय आष्टेकर व सोनग्रा हे स्वतंत्र उमेदवार आहेत.
बँक निवडणुकीच्या निर्धारित कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर रिंगणात राहिलेल्या उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आले. अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवारी संपली. त्यानंतर बुधवारी चिन्हवाटप झाले. मात्र सत्ताधारी आधुनिक पॅनेलने तत्पूर्वीच ‘पतंग’ या चिन्हासह प्रचार सुरू केला होता. तशी प्रचारपत्रके छापून ते सभासदांना वितरित करीत होते. गेल्या पंधरा दिवसांपासून ते चिन्हाचा प्रचार करीत होते. यालाच आष्टेकर व सोनग्रा यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हरकत घेतली होती. याबाबत त्यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावर हौसारे यांनी त्यांना खुलासाही मागितला होता. मात्र तो समाधानकारक नसल्याचे कारण देत बुधवारी त्यांनी आधुनिक पॅनेलला हवे असलेले ‘पतंग’ हे चिन्ह निवडणुकीतूनच गोठवून टाकले. त्याऐवजी त्यांना ‘छत्री’ हे चिन्ह देण्यात आले असून या पॅनेलला हा मोठाच धक्का मानला जातो. सभासदांपर्यंत त्यांनी ‘पतंग’ हे चिन्ह पोहोचवले असल्याने आता नव्या ‘छत्री’ या चिन्हासाठी त्यांना मोठेच परिश्रम घ्यावे लागतील. आष्टेकर व सोनग्रा यांना ‘कपबशी’ हे चिन्ह देण्यात आले आहे.

BJP, Sangli, Resignation of former MLA,
माजी आमदाराचा राजीनामा तर पक्षांतर्गत खदखदीमुळे सांगलीत भाजपची चिंता वाढली
Raj thackeray, Mahayuti, MNS,
मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा फायदा किती ?
PM Narendra Modi And Govindam
‘कोणतंही हुकूमशाही सरकार फार काळ टिकू शकलं नाही, त्यामुळे भाजपाच्याही नशिबात तेच आहे’; कम्युनिस्टांचा दावा
Pappu Yadav’s claim on Purnea
पप्पू यादव पूर्णियातून लढण्यावर ठाम; काँग्रेस-राजदमधील जागावाटपाचा तिढा सुटेना