02 March 2021

News Flash

चंद्रपुरात मामाने केली चार वर्षांच्या भाच्याची हत्या

हत्येमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही

(संग्रहित छायाचित्र)

अंगणात खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुरड्या भाच्याची त्याच्या मामानेच हत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपुरातल्या दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वरवट या ठिकाणी घडली. दुपारी 12 च्या सुमारास हा सगळा प्रकार उघडीकस आला. दिक्षांत कावडे (वय- 4 वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या भाच्याचं नाव आहे. तर रंगनाथ गेडाम (वय-40) असं त्याच्या मामाचं नाव आहे.

चंद्रपूर जिल्हा मुख्यालयापासुन काही अंतरावर असलेल्या वरवट गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मामा आणि भाच्याचं नातं हे प्रेम आणि आपुलकीचं नातं समजलं जातं. मात्र वरवट गावात मामानेच भाच्याला ठार केल्याची घटना घडली आहे. वरवट या गावात दिक्षांत त्याच्या घराजवळ खेळत होता. त्याचवेळी त्याचा मामा रंगनाथ तिथे आला. त्याने चार वर्षांच्या दिक्षांतच्या डोक्यावर काठीने घाव घातले. या घटनेत दिक्षांत जागीच ठार झाला. या घटनेची माहिती आजूबाजूच्या नागरिकांना होताच त्यांनी हल्लेखोर मामा पकडून ठेवले. घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपी रंगनाथ गेडाम (४०) याला पकडून चोप दिला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत आरोपीला ताब्यात घेतले. दिक्षांतचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही त्यामुळे हत्येचा अद्याप उलगडा झालेला नाही. मामा हा मनोरुग्ण असल्याची माहिती आहे. यापुढील तपास आता पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2020 9:14 pm

Web Title: uncle killed his four year nephew in chandrapur police case registered scj 81
Next Stories
1 कोरेगाव भीमा प्रकरण : NIA ची टीम पुणे पोलीस मुख्यालयात
2 पाथरीच्या विकासासाठी मदत देऊ : नवाब मलिक
3 मी भाजपा सोडणार या अफवांवर विश्वास ठेवू नका-पंकजा मुंडे
Just Now!
X