राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांना आळा बसवण्यासाठी राज्य सरकारकडून शक्ती कायदा आणला जात आहे. या कायद्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर झाल्यानंतर तो केंद्र सरकारडे पाठवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना याबाबत थोडक्यात माहिती दिली.
महिलांचे सोशल मीडियावर चुकीचे फोटो टाकून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असून, अशा दोषी व्यक्तींना दोन वर्षांची शिक्षा शक्ती कायद्यांतर्गत मिळणार आहे. तसेच, महिलांकडून खोटी तक्रार दाखल केली गेल्यास त्यांना देखील एक वर्षांची शिक्षा असणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
Under Shakti law, there’s a provision of punishment for 2 years for those who defame women by putting their wrong photos on social media. In case of a false complaint by women, provision of punishment for 1 year to guilty women also there: Maharashtra Home Minister Anil Deshmukh pic.twitter.com/Z0UY4EuAwM
— ANI (@ANI) December 10, 2020
काय आहे ‘शक्ती’ कायदा?
प्रस्तावित ‘शक्ती’ कायद्यानुसार, महाराष्ट्रातील महिला अत्याचारांच्या प्रकरणात २१ दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करुन खटला चालवून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे. महिलांवरील अॅसिड हल्ले आणि बलात्कारासारखे गुन्हे अजामिनपात्र करण्यात येणार आहेत. इतकचं नाही तर महिलांचा जर ई-मेल, इलेक्ट्रॉनिक मीडियातून किंवा मेसेजद्वारे छळ करण्यात आला तसेच त्यांच्यावर जर चुकीच्या पद्धतीची कमेंट करण्यात आली तर त्यासाठीही कडक शिक्षा होणार आहे. यासाठी दोन वर्षांसाठी तुरुंगवास आणि दंडाचाही समावेश आहे.
बलात्कार करणाऱ्याचा २१ दिवसांत फैसला, ठाकरे सरकार करणार कायदा
सामुहिक बलात्कार किंवा बलात्कार प्रकरणात दुर्मिळात दुर्मिळ असं जर बलात्कार प्रकरण असेल तर त्यात मृत्यूदंडाची शिक्षा आहे. बलात्कार प्रकरणांचं वर्गीकरण करण्यात आलं असून यामध्ये जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि १० लाखांपर्यंतचा दंड अशीची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. सोळा वर्षांच्या खालील मुलीवर बलात्कार झाल्यास दोषीला मरेपर्यंत जन्मठेप आणि मृत्यूदंडाच्या शिक्षा होऊ शकते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 10, 2020 7:20 pm