भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मुंबईत ‘संपर्क से समर्थन’ या अभियानांतर्गत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. केंद्र सरकारच्या चार वर्षांतील कामगिरीची माहिती पुस्तिका गडकरी यांनी त्यांना दिली. यावेळी नाना पाटेकर आणि नितीन गडकरी यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी ‘संपर्क से समर्थन’ या अभियानांतर्गत विविध क्षेत्रातील नामवंतांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. शुक्रवारी गडकरी यांनी वांद्रे येथील सलमानच्या घरी सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी येस बँकेचे अध्यक्ष राणा कपूर यांचीदेखील भेट घेतली.

दोनच दिवसांपूर्वी अमित शहा यांनी मुंबई भेटीत जनसंपर्क समर्थन अभियानांतर्गत अभिनेत्री माधुरी दिक्षीत आणि उद्योजक रतन टाटा यांची भेट घेतली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister nitin gadkari meets nana patekar salman khan and salim khan
First published on: 09-06-2018 at 14:56 IST