शरद पवारांना पराभवाचा अंदाज आल्यानेच त्यांनी लोकसभेतून माघार घेतली आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. पवारांच्या निवडणूक न लढण्याच्या घोषणेवरून सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा होते आहे. आता नितीन गडकरींनी यावर प्रतिक्रिया देत पराभवाचा अंदाज आल्यानेच पवारांनी माघार घेतल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांच्याबद्दलही नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे हे माझे कालही मित्र होते आणि आजही आहेत. मात्र सध्या ते असं का वागत आहेत? मला सांगता येत नाही असंही गडकरी यांनी म्हटलं आहे. एअर स्ट्राईकचे राजकारण आम्ही केले नाही करणार नाही असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे. राफेल विमान असते तर एअरस्ट्राईक दुरून करता आले असते. दीडशे किलोमीटर दुरून अतिरेक्यांच्या ठिकाणावर वार करता आला असता.

मी फारसा राजकारणी नाही. माझा पक्ष माझा आहे दुसऱ्या राजकीय पक्षातही माझे मित्र आहेत. माझ्या व्यक्तीमत्वावर संघाचा आणि भारतीय विद्यार्थी परिषदेचा पगडा. मला घराची ओढ लागली आहे आता नातवंडांची आठवण येते.शेतकऱ्यांसाठी मला एक काम करायचे ज्या दिवशी विदर्भातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्या दिवशी माझे स्वप्न पूर्ण होईल असंही गडकरींनी म्हटलं आहे.