राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे;

  • नवीन महाराष्ट्र घडवण्याची ताकद राज ठाकरेच्या मनगटात आहे.
  • आजवर महाराष्ट्रापुढे पर्याय नव्हता पण आता हा राज ठाकरे तुमच्यासमोर पर्याय आहे.
  • सुरेशदादा जैन यांनी विधानपरिषदेसाठी ९५ कोटी खर्च केल्याचा राज ठाकरेंचा आरोप.
  • राज ठाकरेंनी केली सुरेशदादा जैन यांची नक्कल.
  • सर्वच बाबतीत भ्रष्टाचार सुरू असताना कोणकोणत्या विषयावर बोलायचं.
  • समोरच्या वाईट माणसाला हाणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच काठी उपयोगी पडेल.
  • दुष्काळामुळे महाराष्ट्रातील मुली वेश्याव्यवसायात फेकल्या गेल्या आहेत.
  • राज ठाकरेंची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका.
  • अजित पवार, याच्यापुढे तुम्हाला महाराष्ट्रातून मत नाही मुत मिळेल.
  • मुंब्य्रातील इमारत अपघातात दगावलेले  ८० टक्के मुलसमान आणि २० टक्के हिंदू मात्र सर्वजण उत्तर प्रदेशातील.
  • मुंब्य्रातील अपघातग्रस्त इमारत बांधणारे उत्तर प्रदेशातील.
  • आमचे राजे बेसावध आहेत.
  • आमचा ‘राजा’ जोपर्यंत जन्माला येत नव्हता तोपर्यंत आम्ही पारतंत्र्यात होतो.
  • जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो.
  • राज कारण मोडून काढावं लागेल.
  • महाराष्ट्रात सगळीकडे सारखेच प्रश्न असल्यामुळे आपण एकसंघ महाराष्ट्र पाहिला पाहिजे.
  • संपूर्ण महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे.
  • मी एकसंघ महाराष्ट्र बघतो.
  • संयुक्त महाराष्ट्र आज ‘विभक्त महाराष्ट्र’ झाला आहे.
  • महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी जातीच्या नावावर महापुरूषांचं विभाजन केलं.
  • आर.आर.पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्यापेक्षा मराठी तरूणांच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवे.
  • महाराष्ट्रातील जनतेला राज्यकर्त्यांनी गृहीत धरलेलं आहे.
  • महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारणी मनाने हरलेला आहे.
  • महाराष्ट्रातल्या प्रश्नांबद्दल सर्वपक्षीय एका व्यासपीठावर येत नाहीत, तर फक्त आरक्षणासाठी येतात.
  • मी देशाला मानतो पण पहिल्याप्रथम मी मराठी माणूस आहे.
  • महाराष्ट्रात येणा-या उद्योगधंद्यांमध्ये मराठी माणसांनाच प्राधान्य मिळालं पाहिजे.
  • आम्ही मराठी माणसांबदद्ल बोलतो, त्यामुळे राज्य सरकार आमच्यावरच केसेसे टाकते.
  • मी मत मागायला नाही तर मत मांडायला आलोय.
  • कुठल्याही पक्षाच्या नेत्यासोबत माझे वैयक्तीक मतभेद नाहीत, पण चुकीच्या गोष्टींबद्दल मी बोलणारच.
  • राज ठाकरेला विकत घेणारा अजून जन्माला यायचाय.
  • दौ-यात मला कुणाला व्यवस्थित वेळ देता आला नसेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
  • पोतडीत भरपूर विषय आहेत, हळूहळू बाहेर काढणार.
  • राज ठाकरेंच्या राज्यव्यापी दौ-याची आज जळगावमध्ये सांगता.