27 May 2020

News Flash

Coronavirus : विद्यापीठ, महाविद्यालय, सीईटी परीक्षांचे वेळापत्रक नव्याने जाहीर होणार

विद्यापीठ आणि महाविद्यालय परीक्षेच्या नियोजनासाठी समिती स्थापन

संग्रहित छायाचित्र

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (सोमवार) दिली.

उदय सामंत यांनी आज राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. “विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटीसेल कडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करून घेण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं.

समितीची स्थापना
या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन असा अहवाल तयार करून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आणि मंत्री यांना सादर करतील. त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 6:47 pm

Web Title: university college jee exam new timetable will be given soon education minister uday samant coronavirus jud 87
Next Stories
1 Lockdown: कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आलेल्या खलाशांचा झाला हिरमोड
2 या ठिकाणी आहेत कोव्हिड-१९ निदान व तपासणी प्रयोगशाळा; पाहा जिल्हानिहाय यादी
3 “राज्यात पूर आला तेव्हा फडणवीसांना आधारकार्डवर रेशन देण्याची कल्पना का सुचली नाही?”
Just Now!
X