पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी संगणक अभियंत्या पतीच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी रात्री उशिरा समोर आली. आरोपी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासह अनैसर्गिक कृत्य केलं आणि नग्न फोटो स्वतःच्या मित्राला पाठवले होते. हे फोटो फेसबुकवर व इतर सोशल मीडियावर टाकण्याची धमकीही त्याने दिली होती. याप्रकरणी २४ वर्षीय पत्नीने पोलिसात तक्रार नोंदवली आहे. माहेरहून फॉर्च्युनर गाडी घेऊन ये अशी मागणी देखील पती करायचा असं तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी पती हा हिंजवडीमध्ये नामांकीत कंपनीत संगणक अभियंता आहे, तर पत्नी ही उच्चशिक्षित असून गृहिणी आहे.

सविस्तर माहिती अशी की, २४ वर्षीय विवाहित महिलेने पतीविरोधात अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. विवाह झाल्यानंतर पती आणि पत्नी हे गोवा येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी पतीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य केले. त्याचे फोटो मोबाईलमध्ये काढत पत्नीचा मोबाईल संमतीशिवाय काढून घेतला आणि नग्न फोटो हे मित्राला पाठवून सेव करण्यास सांगितले. हे सर्व फोटो फेसबूक, नातेवाईक आणि इतर मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी पत्नीला दिली. एवढं झाल्यानंतर देखील माहेरहून फॉर्च्युनर गाडी घेऊन ये असा तगादा संगणक अभियंता पती, सासरे आणि नणंद यांनी लावला. त्यानंतर फिर्यादीच्या भावासह आई आणि वडिलांना नणंदने शिवीगाळ केली.

bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
youth was kidnapped
खळबळजनक..! मृतदेहाची इन्स्टाला स्टोरी (स्टेटस) ठेवली; ‘त्या’ तरुणाची अपहरण करून केली हत्या
women Forcefully married with travels businessman and stolen 17 lakhs
‘लुटेरी दुल्हन!’ ट्रॅव्हल्स व्यापाऱ्याशी बळजबरी लग्न, १७ लाख उकळले
kidney transplantation marathi news, laparoscopy technology marathi news
लॅप्रोस्कोपी तंत्रज्ञानाद्वारे मूत्रपिंड प्रत्यारोपण; चिरफाड न करता शस्त्रक्रिया यशस्वी

याप्रकरणी २४ वर्षीय पत्नीने पतीसह,सासरे आणि नणंद यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत करत आहेत.