27 February 2021

News Flash

गारपिटीमुळे कळंब, उस्मानाबादमध्ये रब्बी पीकांचे मोठे नुकसान

उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील फळबागांसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दिवसभर ऊन असताना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानकपणे गारपिटीचा पाऊस सुरू झाल्याने उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील फळबागांसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली, पाडोळी परिसरात सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह गारपीट झाली. दोन्ही गावांच्या परिसरात द्राक्षबागा नाहीत. मात्र आंबा, मोसंबी या फळबागांसह रब्बी ज्वारी, गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. कळंब तालुक्यातही अचानकपणे झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

शिराढोण, गोविंदपूर, खामसवाडी, सौंदाना (अंबा), नायगाव व पाडोळी गाव व परिसरात गारांचा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आंबा, मोसंबी, द्राक्ष, हरभरा, ज्वारी, गहू व कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शिराढोण येथील शेतकरी राजेंद्र मुंदडा याच्या आंब्याची व संत्र्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी रोडलगतची झाडे देखील वादळी वार्‍यामुळे जमिनदोस्त झाली आहेत. एकीकडे करोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि दुसरीकडे शेतकर्‍यांपुढे निर्माण झालेले अवकाळी पावसाचे संकट यामुळे शेतकरी वर्ग पुरता हतबल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 9:18 pm

Web Title: unseasonal rain damage crop dmp 82
Next Stories
1 मुंबई उद्यापासून अंशत: लॉकडाऊन, ठाकरे सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय
2 महाराष्ट्रातील करोना व्हायरसच्या तीन रुग्णांवर HIV प्रतिबंधक औषधांचा वापर
3 Coronavirus: राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी विचारले “महाराष्ट्रात आणखीन काय करणं बाकीय सांगा?”; हर्ष वर्धन म्हणाले…
Just Now!
X