सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सलग तीन दिवस कमीजास्त प्रमाणात वादळी वाऱ्यांसह पडलेल्या अवकाळी पावसामुळे तसेच काही भागात गारपीटही झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र समोर येत आहे.

काल मंगळवारी सायंकाळी पाचनंतर ढगांचा गडागडाट, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच गावांना झोडपून काढले. सोलापूर शहरात ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असताना या पावसामुळे सखल भागात पाणी शिरले होते. रेल्वे स्थानकाजवळील काडादी चाळीसह कोनापुरे चाळ, जगजीवनराम झोपडपट्टी, निराळे वस्ती आदी भागात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले होते. मोदीजवळील रेल्वे बोगद्याखाली प्रचंड पाणी साचल्यामुळे तेथील वाहतूक विस्कळीत झाली होती. जुने एम्प्लॉयमेंट चौक, डफरीन चौक आदी भागात प्रमुख रस्ते जलमय झाल्यामुळे वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली होती. यात भर म्हणून काही ठिकाणी नवे—जुने वृक्ष उन्मळून पडले. झाडांच्या फांद्य तुटून पडल्या. त्याचा परिणाम वीजपुरवठय़ावर झाला आणि शहरातील जवळपास निम्मा भाग वीज खंडित होऊ न अंधारमय झाला होता.

शहराप्रमाणे ग्रामीण भागातही अवकाळी पावसाने झोडपून काढले. यात शेतीचे नुकसान झाले. एकीकडे करोना भयसंकट अस्वस्थता वाढवत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकरम्य़ांचे कंबरडे मोडल्याचे सांगण्यात आले. द्राक्ष व केळी बागांसह शेतात काढणी करून ठेवलेली ज्वारी, जनावरांचा कडबा, कांदा, तूर, हरभरा व अन्य पिकांची हानी झाली. पंढरपूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा आदी भागात अवकाळी पाऊ स पडला. पंढरपूर तालुक्यातील एकटय़ा बाभुळगावात सुमारे दीडशे एकर केळीच्या बागांना फटका बसल्याचे तेथील शेतकरम्य़ांचे म्हणणे आहे. मंगळवेढा भागात किरकोळ स्वरूपात गारपीट झाली. त्यामुळे शेतातील काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले.