News Flash

“उर्मिला यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला आहे, पण…”

राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

“उर्मिला यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला आहे, पण…”

बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधत नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्याआधी उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

उर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशावर आदित्य ठाकरे म्हणतात…

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं तीन पक्षांचं सरकार आहे. उर्मिला यांनी जवळपास वर्षभर आधी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावर राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. ” अनेक राजकीय पक्षांमध्ये बॉलिवूडमधील किंवा मराठी सिनेमातील कलाकार प्रवेश करतात. उर्मिला यांनी शिवसेनेत प्रवेश केला ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांचं मी सक्रीय राजकारणात स्वागत करतो. त्यांनी आधी काँग्रेससोबत काम केलं. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली पण तरीही जर त्या राजकारणात येऊन शिवसेनेच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करण्यास तयार असतील, तर त्यांचे स्वागत आणि त्यांना शुभेच्छा”, असे भुजबळ म्हणाले.

राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपात येणार? चंद्रकांत पाटील यांचं सूचक उत्तर

दरम्यान, उर्मिला यांच्या पक्षप्रवेशावर राज्याचे युवा मंत्री आदित्य ठाकरे यांनीही आपलं मत व्यक्त केलं. “उर्मिला मातोंडकर यांचं सर्वच शिवसैनिक स्वागत करत आहेत. महाराष्ट्रात विविध लोकोपयोगी कार्यात त्यांचा सहभाग असेल याची खात्री आहे. आपल्या राज्यासाठी त्या नक्कीच चांगलं काम करतील. पक्षप्रवेशाच्या वेळी आमची भेट झाली. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा खरोखरच आनंद आहे. त्यांना चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा!”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2020 5:52 pm

Web Title: urmila matondkar shivsena joining ceremony chagan bhujbal reaction ncp congress relations maharashtra politics vjb 91
Next Stories
1 “सैनिकांच्या जागेवर ‘आदर्श’ इमारत उभी करताना महाराष्ट्राची प्रगती आठवली नाही?”
2 …अन् पोलिसांनी थेट राजू शेट्टींच्या कॉलरला घातला हात
3 “या पापात सहभागी होऊन भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राशी द्रोह करू नये”; अशोक चव्हाणांचा सल्ला
Just Now!
X