20 January 2021

News Flash

उर्मिला मातोंडकर राजकारणात पुन्हा सक्रिय होणार, सोमवारी शिवसेनेत प्रवेशाची शक्यता

विधान परिषदेसाठीही शिवसेनेकडून त्यांच्या नावाची होती चर्चा

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर. (संग्रहित छायाचित्र)

काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या सदस्यात्वाचा राजीनामा देत राजकारणापासून दूर गेलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत. परंतु आता त्या आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात शिवसेनेपासून करणार आहेत. सोमवारी त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं म्हटलं आहे. यापूर्वीपासूनच त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसंच शिवसेनेकडून विधान परिषदेसाठीही त्यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचं समोर आलं होतं. इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सातत्याने धुसफुस सुरू असतानाच विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार १२ नावांची यादी बंद पाकिटात राज्यपालांना सादर करण्यात आली. यांपैकी एका जागेसाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून उर्मिला मातोंडकर यांची निवड करण्यात आल्याचं समोर आलं होतं.

काँग्रेसकडून सचिन सावंत, रजनी पाटील, मुजफ्फर हुसैन, अनिरुद्ध वणगे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे आणि शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावांची शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता. दरम्यान, राजकारणातून दूर राहिल्यानंतर वर्षभरानंतर त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 2:57 pm

Web Title: urmila matondkar to join shiv sena on monday a year after exiting congress vidhan sabha cm uddhav thackeray jud 87
Next Stories
1 …तर फडणवीसांच्या हातात सत्ता द्या; उदयनराजेंचं राज्य सरकारला थेट आव्हान
2 अजित पवार तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाही हे…; भाजपा नेत्याचा निशाणा
3 मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला; उदयनराजेंचं ज्येष्ठ नेत्यांवर टीकास्त्र
Just Now!
X