27 January 2021

News Flash

असं होऊ नये म्हणून सर्वच देशांनी प्रयत्न करायला हवेत- रोहित पवार

"लोकशाही ज्या वाटेनं चालली ते पाहून भीती वाटते"

फाइल फोटो (फोटो सौजन्य: एपी)

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूक निकालाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी बायडेन यांनी आघाडी घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व जो बायडेन समर्थक भिडले होते. काही शहरांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या मुद्यावर आमदार रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतांची मोजणी थांबवण्यात आल्यानंतर वॉशिंग्टन, विस्कॉन्सिन, फिलाडेल्फिया, पोर्टलॅण्ड, न्यूयॉर्कसहीत अनेक ठिकाणी बायडन आणि ट्रम्प समर्थक समोर समोर आल्याचे पाहायला मिळालं होतं. काही ठिकाणी या दोन्ही गटांमध्ये हिंसक झटापटीही झाल्या, तर काही ठिकाणी तर पोलीस विरुद्ध विरोधक आंदोलक असं चित्र दिसून आलं होतं. अमेरिकेत निर्माण झालेल्या तणावावरून रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केली.

आणखी वाचा- US Election 2020 : ट्रम्प-बायडेन समर्थक भिडले; अमेरिकेत तीव्र संघर्षाची चिन्हं; यंत्रणा High Alert वर

“जगातील सर्वांत जुनी लोकशाही असलेला व विकसित देश म्हणून आपण अमेरिकेकडं पाहतो. पण इथं शांततामय व लोकशाही मार्गाने सत्तांतर होण्याऐवजी लोक हाती बंदुका घेऊन रस्त्यावर उतरत असतील, तर ती लोकशाही ज्या वाटेनं चालली ते पाहून भीती वाटते व असं होऊ नये म्हणून सर्वच देशांनी प्रयत्न करायला हवेत,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

अनेक ठिकाणी ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलक रस्त्यावर उतरुन घोषणा देत होते. “Whose streets? Our streets!” आणि “If we don’t get no justice, they don’t get no peace!” अशी घोषणाबाजी आंदोलकांकडून करण्यात आली. त्याचबरोबर आंदोलकांनी काही ठिकाणी पोलिसांच्या गाड्यांची नासधूस केली. ज्या ठिकाणी हिंसा होऊ शकते अशा ठिकाणामधील दुकानं बंद ठेवण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 3:11 pm

Web Title: us election president election rohit pawar violence bmh 90
Next Stories
1 “इतर लोक सरकारशी चर्चा करतात, तुम्हाला…”; राष्ट्रवादीचा भाजपाला टोला
2 ‘पुनःश्च हरि ओम म्हणता आणि हरिलाच कोंडून ठेवता?’ मनसेचा ठाकरे सरकारला प्रश्न
3 पुढच्या सात पिढ्या आशिर्वाद देतील; आदित्य ठाकरेंकडे काँग्रेसनं केली मागणी
Just Now!
X