वनस्पतींच्या पोषक वाढीसाठी लोकांनी मानवी मुत्राचा वापर करावा , असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. काही दिवसांपूर्वी नागपूर येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी उपस्थितांना ‘युरिन थेरपी’चे महात्म्य समजावून सांगितले. मी माझ्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेरच्या बगीचातील झाडांसाठी हा प्रयोग करून पाहिल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही दररोज ५० लीटर मानवी मुत्र जमा करतो. या मुत्राचा वापर झाडांसाठी करण्यात येतो. साध्या पाण्यापेक्षा ही ‘युरिन थेरपी’ खूपच प्रभावी असल्याचा दावा गडकरी यांनी केला. मानवी मुत्रामध्ये मोठ्याप्रमाणात नत्र आणि नायट्रोजनसारख्या घटकांचा समावेश असतो. हे घटक वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असल्याने वनस्पतींची वाढ जोमाने होते. त्यामुळे येणाऱ्या काळात मानवी मुत्र कृत्रिम खतांपेक्षा स्वस्त पर्याय ठरू शकेल, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.