15 October 2019

News Flash

उस्मानाबाद : नळदुर्ग किल्ल्यात बोट उलटून तीन बालकांचा मृत्यू

मृतातील तीन जणांमध्ये दोन मुलींचा व एका मुलाचा समावेश आहे. या घटनेत तीन बालकांचा मृत्यू झाल्याने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद : नळदुर्ग येथील किल्ल्यामध्ये बोटींग करताना बोट उलटल्याने तीन बालकांचा मृत्यू झाला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गच्या किल्ल्यात बोटींगचा आनंद लुटताना बोटीतील भार वाढल्याने ती पाण्यात उलटून यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २०) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास किल्ल्यातील बोरी नदीच्या पात्रात घडली. मृतातील तीन जणांमध्ये दोन मुलींचा व एका मुलाचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेत तीन बालकांचा मृत्यू झाल्याने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहीती अशी, एहसान नय्यरपाशा काझी हे आपल्या नातेवाईकांना घेवून किल्ल्यातील नदीपात्रात बोटींग करण्यासाठी गेले होते. दरम्यान, बोटमध्ये बसून बोटींगचा आनंद घेत असताना बोटीच्या समोरच्या बाजूचा भार वाढल्याने बोट पाण्यात उलटली. याची माहिती कळताच किल्ल्यात उपस्थित आसलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ पाण्यात उतरत सात जणांना बाहेर काढण्यात यश मिळविले. मात्र, बोटीतील सानीया फारुक काझी (वय ७), इजान एहसान काझी (वय ५, रा. नळदुर्ग) हे चुलत बहीण भाऊ पाण्यात बुडून मृत्यू पावले तर यामधील अलमाज शफीक जहागिरदार (वय १२, रा. मुंबई) हिला उपचारांसाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

या घटनेतील अलमाज या मुलीला प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे आर्धा तास तातडीचे उपचार मिळू शकले नाहीत. शिवाय येथील वैदयकीय अधिकारी देखील आर्धा तास उशीरा आल्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोप या मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. संतप्त नातेवाईकांनी यासंबंधी दोषी आसणाऱ्या वैदयकीय अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी यासाठी उपविभागीय पोलिस आधिकाऱ्यांना निवदेन दिले. जिल्हा आरोग्य आधिकाऱ्यांना या घटनेची माहीती देवून संबंधीत वैदयकीय अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन उपविभागीय पोलिस आधिकारी संदीप घुगे यांनी नातेवाईकांना दिले आहे.

First Published on April 20, 2019 5:51 pm

Web Title: usmanabad death of three children in the naldurg fort while boat capsized