News Flash

वंचित बहुजन आघाडीची राज्यव्यापी आंदोलनाची हाक

मागास जातीतील लोकांवर झालेल्या अत्याचाराचा मागणार जाब

संग्रहित छायाचित्र

राज्यात मागील काही दिवसांत मागासवर्गीय, बौद्ध व भटक्या जमाती लोकांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या घटनांप्रकरणी जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. उद्या (१७जून) राज्यभरात आघाडीकडून आंदोलन केलं जाणार आहे.

राज्यात मागास जातीतील व्यक्तींवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटवरून निवेदन प्रसिद्ध केलं आहे. “जगामध्ये करोनाचं संकट उद्धभवलेलं आहे. जनजीवन ठप्प झालं आहे. अशातच महाराष्ट्रात मागासवर्गीय, बौद्ध, भटक्यांवरील अत्याचारानं कळस गाठला आहे. वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, महिला आघाडी आदी १७ जून रोजी शहर, तालुका व जिल्हास्तरावर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याला निवेदन देणार आहे. त्यानंतर प्रत्येक तीन दिवसांनी जाब विचारणार आहे,” असं निवेदनात म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरात विराज जगताप या तरुणाची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली होती. यात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केलेली आहे. त्याचबरोबर नागपूरमध्ये अरविंद बनसोड यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा दावा वंचित आघाडीनं केला होता. त्याचबरोबर मे महिन्यात बीड जिल्ह्यातमध्ये पारधी समाजातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. जमिनीच्या वादातून केज तालुक्यातील वडगाव येथे पारधी समाजातील चौघांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित आघाडीनं घटनेनंतर केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 5:23 pm

Web Title: vachin bahujan aghadi call protest in maharashtra bmh 90
Next Stories
1 इसरलंय…; आशिष शेलार यांचा उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांना टोला
2 शाब्बास महाराष्ट्र !… जयंत पाटलांनी थोपटली जनतेची पाठ; जाणून घ्या कारण
3 “सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर, आधी रुग्णांच्या खाटांचं बघा?”
Just Now!
X