News Flash

चिमुकला वरद शहिदांच्या कुटुंबीयांसाठी निधी जमवतोय!

झोंटिंगा येथे कुस्त्यांच्या दंगलीमध्ये बालयोगी वरद जोशी याने अतिशय चांगली योग प्रात्यक्षिके सादर केली.

वर्गणी गोळा करताना वरद जोशी

योग प्रात्यक्षिकांसह जनजागृतीवर भर

अकोला : बुलढाणा जिल्हय़ातील देऊळगावमही येथील बालयोगी वरद संतोष जोशी याने योगासनाचे प्रात्याक्षिक सादर करून शहिदांच्या कुटुंबीयांसाठी निधी उभारण्याचा विधायक उपक्रम सुरू केला आहे. प्रात्याक्षिकांसह वरदचा योगाच्या जनजागृतीवरही भर असतो.

झोंटिंगा येथे कुस्त्यांच्या दंगलीमध्ये बालयोगी वरद जोशी याने अतिशय चांगली योग प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी रसिकांकडून त्याने चार हजार ८०० रुपयांचा निधी जमा केला. चिखली येथील कार्यक्रमात एक हजारावर निधी जमा करण्यात आला. वेगवेगळ्या कार्यक्रमादरम्यान वरद जोशी हजारो रुपयांचा निधी जमा करून तो शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देणार आहे.

पुलवामा हल्लय़ात बुलढाणा जिल्ह्यातील शहीद झालेले नितीन राठोड, संजय राजपूत, तर नुकतेच गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हल्लय़ात शहीद झालेल्या संदीप खार्डे, राजू गायकवाड या चार जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासह शहिदांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी वरद योगाचे धडे गिरवत आहे. देशाच्या संरक्षणाकरिता शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी वरद जोशीने सुरू केलेल्या उपक्रमाचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.

देशासाठी शहीद झालेल्या जिल्ह्यातील जवानांच्या कुटुंबीयांना समाजसेवी संस्थांनी वेगवेगळ्या निमित्ताने मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

– वरद जोशी

शाळा, महाविद्यालयांमधून ३५० शिबिरे

वरदने आजवर मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरे, गावातील शाळा, महाविद्यालयांमध्ये ३५० शिबिरे घेतली. या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. जागतिक योग दिनाचे महत्त्व एका दिवसापुरते मर्यादित न राहण्यासाठी शाळा शिकून हा चिमुकला दुचाकीवरून गावागावात फिरून जनजागृती करत असतो.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 4:24 am

Web Title: varad santosh joshi raise fund for the family of martyrs
Next Stories
1 दुचाकींच्या अपघातात नवदाम्पत्यासह तिघे ठार
2 प्रणिता बोराचे चित्र पंतप्रधान कार्यालयात झळकले!
3 बारामतीत आंतरजातीय विवाहाच्या वादातून मुलीचा खून ; आई अटकेत
Just Now!
X