महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला वर्धनगड किल्ला शिवसेनेने दत्तक घेतला आहे. किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देत पुन्हा एकदा हिरव्यागार निसर्गसौंदर्याने नटवण्याच्या दृष्टीने शिवसेना प्रयत्नशील आहे. वर्धनगड किल्ला आगामी काळात एक उत्कृष्ट पर्यटनस्थळ निर्माण होण्यासाठी शिवसेना पावले उचलत असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते व संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनी दिली. दुष्काळी खटाव तालुक्यातील वर्धनगड किल्ल्यावर ग्रामपंचायत वर्धनगड व पुणे-पिंपरी प्राधिकरण तसेच खटाव तालुका शिवसेनेतर्फे शिव वृक्षसंवर्धन अभियान राबवले गेले. त्यात वर्धनगडावर औषधी व लोकापयोगी सुमारे ५ हजार वृक्षांची लागवड व १२ हजार बियांचे रोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नितीन बानुगडे-पाटील पुढे म्हणाले, की वर्धनगड हा अभेद्य किल्ला दुष्काळी पट्टय़ात असूनही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज इथे वास्तव्याची नोंद इतिहासात सापडते. राजेश फलके, सरपंच अर्जुन मोहिते, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तुकाराम चव्हाण, अर्जुन कुंभार, शंकर घोरपडे, निसार शिकलगार, संजय घोरपडे, भरत मोहिते, अमोल मोरे, विठ्ठल रोकडे, मुख्याध्यापक डी. एम. मायणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

madhurimaraje chhatrapati
प्रचाराच्या धकाधकीत मधुरिमाराजे छत्रपतींनी क्रिकेटचा घेतला आस्वाद; संभाजीराजेंनी मारली नदीत डुबकी
virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
Harsh Goenka shares video
ग्वाल्हेरच्या राजवाड्यात राजेशाही जेवणाचा थाट! पाहा, कसे वाढले जाते महाराजांचे ताट; हर्ष गोयंकांनी शेअर केला Video