लोकसत्ता वार्ताहर
वसई : वसईत शहरी व ग्रामीण मिळून गुरुवारी १६३ नवीन करोना रुग्ण आढळून आले. यामध्ये शहरी भागात १५८ व ग्रामीण मध्ये ५ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. २२१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
वसई विरार महापालिकेच्या हद्दीत गुरूवारी १५८नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला.
शहरातील एकूण करोनाबाधीत रुग्णांची संख्या २४ हजार २० एवढी झाली आहे. मृतांची संख्या ४७३ वर गेली आहे. आज दिवसभरात २१२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
एकूण करोनामुक्तांची संख्या २१ हजार ८२७ इतकी झाली आहे. तसेच ग्रामीणमध्ये आज ५ नवीन रुग्णांची भर पडली. तर ९ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे ग्रामीण मधील एकूण रुग्णांची संख्या १ हजार २३६एवढी झाली. करोनामुक्तांची संख्या १ हजार ८९ वर पोहचली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 9, 2020 12:07 am