News Flash

Coronavirus : वसई-विरारमध्ये ३६ तर, मिरा-भाईंदरमध्ये ३२ रुग्ण

वसई विरारमध्ये पाच नव्या रुग्णांची भर पडली आहे.

(प्रतिकात्म छायाचित्र)

शनिवारी वसई विरार शहरात ५ तर मिरा भाईंदर शहरात २ नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे वसईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या ३६ एवढी झाली आहे. तर मिरा भाईंदरमधील रुग्णांची संख्या ३२ पर्यंत पोहोचली आहे.

विरार मध्ये एक परिचारिका, एक शेअर दलाल तसेच एका करोनाबाधित रुग्णाच्या पत्नीला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर नालासोपारा येथे करोनाबाधित रुग्णाच्या १३ वर्षीय मुलाला, तर वसईतील करोनाने मरण पावलेल्या व्यक्तीच्या २५ वर्षीय मुलाला करोनाची लागण झाली आहे. यामुळे वसई विरारमधील करोनाबाधीत रुग्णांचा आकडा ३६ वर पोहोचला आहे.

मिरा भाईंदरमध्ये २ नवे रुग्ण
मिरा भाईंदर शहरातही शनिवारी करोनाचे दोन नवीन रुग्ण समोर आले आहे. यापैकी एक रुग्ण मिरा रोड पूर्वेला तर दुसरा रुग्ण भाईंदर पश्चिमेला आढळला आहे. यानंतर मिरा भाईंदरमधील रुग्णसंख्या ३२ एवढी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 8:22 pm

Web Title: vasai virar mira bhayander coronavirus affected patients numbers incresed jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
2 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
3 “आजपर्यंत कोणी आमचं तोंड बंद करु शकलेलं नाही, ती हिंमत कोणातही नाही; पण…”
Just Now!
X