News Flash

Video : आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटली; डॉक्टरला बेदम मारहाण

नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल

डॉक्टरशी वाद घालताना रुग्णाचे नातेवाईक. (व्हिडीओ दृश्य)

करोनाच्या पहिल्या लाटेतून विश्रांती मिळतेन् मिळते तोच दुसऱ्या लाटेनं डोकं वर काढलं. त्यामुळे पहिल्या फळीतील कोविड योद्धे असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आला आहे, असं असलं तरी दुसरीकडे डॉक्टरांवर हल्ले होत असल्याच्या घटनाही सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना विरार पूर्वमध्ये घडली आहे. येथे असलेल्या बालाजी रुग्णालयात एका रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरार पूर्वेला बालाजी हॉस्पिटल आहे. शनिवारी एक महिला रुग्ण आपली कोविड आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी गेली होती. दरम्यान, चाचणी करताना या रुग्णाच्या नाकात आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरण्यात येणारी स्टिक तुटल्याचे समजले. यावेळी डॉक्टर पळून जात असल्याचा समजून इमारतीखाली उभ्या असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांला पकडून मारहाण करण्यात आली.

ही सर्व घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे हे शुटिंग नातेवाईकांनीच केलं असल्याचं व्हिडीओतून येणाऱ्या आवाजावरून कळत आहे. या संदर्भात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार पोलिसांनी डॉक्टरांना शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कुणाला अटक केलेली नसल्याची माहिती विरार गुन्हे पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 3:24 pm

Web Title: vasai virar news attack on doctor case registered against patient relatives bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “बाळासाहेब म्हणाले होते, कोकणसाठी सरकारचे कान पिळेन; आज त्यांच्याच सुपुत्राने तोंडाला पानं पुसली”
2 कटूपणा घेण्याची माझी तयारी; मुख्यमंत्र्यांचं लॉकडाउनबद्दल सूचक विधान
3 तिसऱ्या लाटेतही लहान मुलांमधील करोना कसा रोखणार?; मुख्यमंत्र्यांनी साधला टास्क फोर्सशी संवाद!
Just Now!
X