03 June 2020

News Flash

‘बविआ’च्या जव्हार तालुकाध्यक्षाला अटक

अखेर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

संग्रहित छायाचित्र

बलात्कार आणि ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

कासा : बहुजन विकास आघाडी या पक्षाचे जव्हार तालुकाध्यक्ष दत्तू यशवंत घेगड यांच्यावर ठार मारण्याची आणि कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचा आणि बलात्कार करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

जव्हार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तू घेगड यांनी जव्हार येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात कामाला असलेल्या एका महिलेस २०१७ पासून ठार मारण्याची आणि कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

अखेर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दिलेल्या फिर्यादीवरून दत्तू घेगड याला जव्हार पोलिसांनी बुधवारी, १९ फेब्रुवारी रोजी रात्री अटक केली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे जव्हार पोलीस ठाण्याला भेट दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हारचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 12:37 am

Web Title: vba javhar taluka chairman arrested akp 94
Next Stories
1 पालघरमधील शीतगृह निरुपयोगी
2 वाहतूक कोंडीवर केवळ चर्चाच!
3 कोल्हापूर: प्लास्टिक पिशवीच्या वापरामुळे ‘झोमॅटो’ व ‘स्विगी’ला प्रत्येकी पाच हजारांचा दंड
Just Now!
X