भारताला आपलं गतं वैभव प्राप्त करायचं असेल?, तर वैदिक शास्त्राच्या रस्त्यावर चालण्याची गरज आहे. या मार्गाने चलल्यास देशासमोरील सर्व समस्या सुटतील. वेदामुळे स्त्रियांवरील अत्याचार देखील थांबतील असे मत मुंबईचे माजी पोलीस अधिक्षक आणि केंद्रीय मानव संसाधन मंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केले आहे. औरंगाबाद इथं आयोजित अखिल भारतीय वैदिक संमेलनात ते बोलत होते.

महिलांवरील वाढत्या आत्याचाराच्या घटना फक्त कायद्यानं थांबू शकत नाही. त्यासाठी संस्कारांची गरज असून वेदामधून ते संस्कार मिळतील ज्यामुळे महिला अत्याचाराच्या घटना थांबतील असा विश्वास सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केला.

वैदिक शास्त्राचे महत्व सांगताना व्यक्तीगत जीवनात आनंदी रहायचं असेल, समाजाची प्रगती करायची असेल, राष्ट्राचा विकास करायचा असेल तर वेद गरजेचा आहे. वेदविद्याचा काळ सुरु होता. तेंव्हा भारतात सम्राट अशोक सारखी लोक झाली. वेद हा संपूर्ण समस्यांचं मूळ असून त्याचा समवेश आपल्या जीवनात व्हायला हवा असे मत सिंह यांनी नोंदवले. अनेक ऋषींनी मौखिक पद्धतीनं वेद जिवंत ठेवल्याचे सिंह यांनी सांगितले.

आज वेद विद्येच्या ११३१ शाखांपैकी केवळ ३८ शाखा जिवंत असून त्यातही भारतात केवळ आठच शाखा आहेत. जगाची निर्मिती झाली तेव्हापासून वेद गंगा वाहते. जेवढी किंमत सूर्याची तेवढीच किंमत वेदांची आहे. व्यक्तीगत जीवनात आनंदी रहायचं असेल, समाजाची प्रगती करायची असेल किंवा अगदी राष्ट्राचाही विकास करायचा असेल तर वेद गरजेचा आहे. जगानं ‘योग’ स्वीकारला. ‘आयुर्वेद’ स्वीकारत आहेत तसेच ते वेदही स्वीकारतील असं ते म्हणाले.