निवडणुकीसाठीचे दरपत्रक आयोगाकडून जाहीर

जिल्हा परिषद निवडणुकीचे घमासान सुरू झाले असून, मांसाहारी जेवणासाठी प्रतिव्यक्ती १७० रुपये, तर शाकाहारीसाठी ७० रुपये खर्चात धरले जाणार आहेत. जिल्हा परिषदेसाठी खर्चमर्यादा ३ लाख आणि पंचायत समितीसाठी २ लाख असली तरी यापेक्षा कितीतरी अधिक खर्च उमेदवाराकडून होत असल्याने यावर देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्र यंत्रणा कार्यरत केली आहे.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
how to make kala masala at home recipe
Recipe : आजीबाईंनी दिलेल्या प्रमाणाने घरच्याघरी बनवा ‘गोडा मसाला! लिहून घ्या हे प्रमाण
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल
dubai five year multiple entry visa
विश्लेषण : दुबईने भारतीय पर्यटकांना पाच वर्षांसाठी ‘मल्टीपल एंट्री व्हिजा’ देण्याची घोषणा का केली? याचा भारतीयांना कसा फायदा होईल?

निवडणूक म्हटले, की कार्यकर्त्यांचा शिणवटा घालवण्यासाठी आणि जेवणावळी या नित्याच्या बाबी अलीकडच्या काळात गृहीतच धरल्या जातात. दिवसभर प्रचाराचे रान उठवत असताना श्रमपरिहार हा अत्यावश्यक असल्याचे ठरूनच गेले असल्याने उमेदवारांनाही सढळ हाताने खर्च करावा लागतो. जनसेवेचे व्रत हाती घेतले असल्याने लोककल्याणासाठी थोडाफार खर्च अपेक्षितच असतो. मात्र हा खर्च वहीत नोंदवून निवडणूक अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेणे उमेदवारांना बंधनकारक आहे. बऱ्याच वेळा केला जाणारा खर्च आणि प्रत्यक्षात नोंदवण्यात आलेला खर्च यामध्ये मोठय़ा प्रमाणात तफावत असते. ही तफावत दूर करण्याचे प्रयत्न आयोगाने केले आहेत. यानुसार निवडणुकीत केल्या जाणाऱ्या खर्चाचे पत्रकच आचारसंहिता पथकाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यानुसार चहाचा दर १० रुपये, तर कॉफीचा दर १२ रुपये आहे. जेवणावळीसाठी शाकाहारी ७० ते १२० रुपये आणि मांसाहारीसाठी १३० ते १७० रुपये प्रतिथाळी असे दर निश्चित करण्यात आले आहेत. हे जेवणाचे दर कार्यकर्त्यांच्या संख्येनुसार कमीअधिक असे निश्चित केले जातील. नाश्त्यासाठी असलेल्या पदार्थाचे दरपत्रक असे- उपीट, पोहे २० रुपये प्लेट, मिसळ, बटाटावडा दोन नग, पुरी भाजी प्लेट प्रत्येकी ३० रुपये, पुरी प्लेट १५ रु. इडली सांबार, मसाला डोसा ३५रु. उतप्पा ४० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.

जेवणावळी अथवा कार्यकर्त्यांच्या संख्येनुसार उमेदवाराने खर्च दर्शवला असला तरी करण्यात आलेल्या शूटिंगमध्ये किती लोक होते यावर खर्च आकारण्यात येणार आहे. तो खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाणार आहे. याशिवाय कापडी मंडपासाठी आकारण्यात येणारे भाडेही ठरवण्यात आले आहे. ग्रामीण भागासाठीचे भाडे असे आहे. कापडी मंडपासाठी प्रतिचौरस फूट ८, कापडी प्रवेशद्वार, कमान १८००रु. खुर्ची लोखंडी १०० नग ६ हजार रुपये, प्लॅस्टिक १२०० रु. टेबल लोखंडी ६० रु. लाकडी १२० रु. व्यासपीठ लाकडी प्रतिचौरस फूट ४० रुपये, तर बॅरेकेटिंग ५ फूट उंचीचे २५० रुपये रिनग फूट, तर चार फूट उंचीचे ४ रुपये रिनग फूट असे दर आहेत.

या दरानुसार आकारणी करून उमेदवारांच्या निवडणूक खर्चामध्ये याचा समावेश करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर होत असल्याने मोठय़ा प्रमाणात चुरस असल्याने कार्यकत्रे कायम आपल्या गटातच राहावेत, यासाठी रोजच्या जेवणावळीही घातल्या जातात. मात्र या जेवणावळीला निवडणुकीचे औचित्य लागू नये यासाठी एखाद्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त धरून या मेजवान्यांचे नियोजन करण्याचा फंडा सध्या अवलंबला जात आहे.