16 January 2021

News Flash

वर्ध्यात मास्क न वापरणाऱ्यांचे वाहन होणार जप्त

नियम न पाळणाऱ्या नागरिकांना आज नियमित मास्क वापरण्याची अधिकाऱ्यांमार्फत शपथ देण्यात आली

प्रशांत देशमुख

राज्यात करोना बाधितांची संख्या कमी होत असतानाच दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. मात्र तरीही नागरिकांमध्ये करोना विषयी गांभीर्य आलेले दिसत नाही. अनेकांकडून करोनापासून वाचण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. राज्यभरात मास्क न वापरणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे. अशातच वर्धा शहरातील नागरिकांनी मास्कचा वापर नियमित करावा याकरिता जनजागृती करण्यात येत आहे. वर्ध्यात  १ नोव्हेंबर रविवारपासून मास्कचा वापर न केल्यास पोलिसांकडून त्या व्यक्तीचे वाहन एका दिवसाकरिता जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

स्थानिक नगर पालिका, महसूल विभाग व पोलीस विभाग यांच्या सहकार्याने ही मोहिम राबवण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टनसिंग पाळावे, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा आणि स्वतःला तसेच आपल्या कुटुंबाला आणि शहराला करोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटे पासून दूर ठेवावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पालिका प्रशासनाने गुरुवारपासून करोना प्रतिबंधात्मक उपाय कठोरतेने राबविणे सुरूवात केली आहे. मुख्याधिकारी बिपीन पालिवाल यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना या मोहिमेत गैरहजर न राहता सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान आज नगरपालिका आणि महसूल पथकाद्वारे नागरिकांनी मास्कचा वापर करावा यासाठी त्यांना शपथ देण्यात आली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 11:22 pm

Web Title: vehicles of non wearing masks will be confiscated in wardha abn 97
Next Stories
1 दिलासादायक! राज्यात आजही नव्या रुग्णांच्या तुलनेत बरं होण्याऱ्यांच प्रमाण अधिक
2 विधानपरिषदेसाठी शिवसेनेच्या ऑफरला उर्मिला मातोंडकर यांचा होकार
3 मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा; ‘मातोश्री’वर नेणार मशाल मोर्चा!
Just Now!
X