News Flash

वालीव पोलीस ठाण्यासमोर उभी करण्यात आलेल्या वाहनांना भीषण आग

वसई पूर्व भागातील घटना; जवळपास ३५ जप्त केलेली वाहनं जळून खाक

वसई-विरार शहरात एकापाठोपाठ एक अशा आगीच्या घटना समोर येत आहेत. आज दुपारी वसई पूर्व भागात वालीव पोलीस ठाण्याच्या समोर उभा करण्यात आलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात वाहने जळून खाक झाली आहेत.

वसई पूर्व भागात वालीव पोलीस ठाणे परिसर आहे. या पोलीस ठाण्याच्या समोरच जप्त केलेली व अपघातांमधील काही वाहने ठेवण्यात आली होती. दरम्याना आज(रविवार) भर दुपारी या वाहनांनी पेट घेतला. एका पाठोपाठ एक अशी ही वाहने उभी करण्यात आलेली असल्याने आग पसरत गेली व मोठा भडका उडाला. घटनेची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. आगीची तीव्रता अधिक असल्याने या आगीत जप्त केलेली जवळपास ३५ वाहने जळाली. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अजूनही समजू शकले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2021 7:10 pm

Web Title: vehicles parked in front of valiv police station caught fire msr 87
Next Stories
1 “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवली”
2 हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला, ही दुर्दैवी गोष्ट -शरद पवार
3 …तर ठाकरे सरकार कोसळेल; सचिन वाझेंच्या अटकेनंतर कंगनाचं ट्विट
Just Now!
X