राज्य विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून वेणुनाथ कडू यांना उमेदवारी मिळाली आहे. कडू यांच्या रूपाने परिषदेकडून पहिल्यांदाच रायगड जिल्ह्य़ाला दिलेल्या उमेदवारीमुळे रायगड जिल्ह्य़ातील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Resignation of district president of Vanchit Bahujan Aghadi in Solapur Srishail Gaikwad
सोलापुरात वंचित बहुजन आघाडीला जिल्हाध्यक्षाची सोडचिठ्ठी
karan pawar marathi news, jalgaon lok sabha karan pawar marathi news
भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना पक्षप्रवेशानंतर लगेचच ठाकरे गटाची जळगावमधून उमेदवारी
wardha lok sabha
वर्धा : शरद पवार यांच्या उपस्थितीत अमर काळे यांचा पक्षप्रवेश, उमेदवारीवर शिक्कामोर्तब
Congress state vice president Kishore Gajbhiye filed an independent nomination form in Ramtek Lok Sabha constituency
रामटेकमध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी; गजभियेंचा वंचित कडून अर्ज

वेणुनाथ कडू हे सध्या शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. गेली २५ वष्रे संघटनेत काम करीत असताना शिक्षकांच्या अनेक समस्यांवर त्यांनी लढे दिले आहेत. शिक्षणसेवा योजना आली तेव्हा त्यांच्या वेतनात दुप्पट वाढ करण्यासाठी कडू यांनी यशस्वी आंदोलन केले. शासनाच्या कायम विनाअनुदानित धोरणातील कायम हा शब्द काढण्यास भाग पाडले. सेवक संच नि धोरण, शिक्षकेतरांचा आकृतिबंध, अनुकंपा, सेवाशर्ती, वेतनेतर अनुदान, जुनी पेन्शन योजना, असे अनेक लढे कडू यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आले.

गेली अनेक वष्रे संघटनेच्या माध्यमातून लढे लढताना कोकणात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण झाले असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे वेणुनाथ कडू यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. नवीन शासननिर्णयांची अंमलबजावणी होताना शिक्षकांच्या नोकरीवर टाच येणार नाही, यासाठी आपण कटिबद्ध आहोत. माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरती शासनाकडून करण्यास आपला पािठबा असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले.

आमदार विनायक मोते हे सध्या या मतदारसंघातून सलग २ वेळा प्रतिनिधित्व करताहेत. त्यांना विचारात घेऊनच माझी उमेदवारी जाहीर करण्यात आली असून मोते यांचा मला पूर्णपणे पािठबा आहे. ते किंवा त्यांचे कार्यकत्रे नाराज असल्याच्या ज्या बातम्या येत आहेत त्या निराधार आणि कपोलकल्पित असल्याचा खुलासा कडू यांनी या वेळी केला. या निवडणुकीत साधारण २५ ते ३० हजार मतदार नोंदणी होईल अशी अपेक्षा असून आपला विजय निश्चित असल्याचा दावा कडू यांनी या वेळी केला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी भोसले, रायगड जिल्हाध्यक्ष संजय निजापकर, राज्य प्रतिनिधी राजेश सुर्वे, कोकण प्रतिनिधी सुशील वाघमारे, मुरुड तालुका अध्यक्ष सतीश कुळकर्णी, रोहा तालुकाध्यक्ष उमेश महाडेश्वर, राणे आदी उपस्थित होते.