‘नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे, हा डाग धुतल्याशिवाय राहणार नाही’ अशी झोंबणारी टीका राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेता रामदास कदम यांनी केली होती. अपेक्षेप्रमाणे या टीकेला आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर देताना रामदास कदमांची तुलना थेट कुत्र्यासोबत केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते रामदास कदम –
शुक्रवारी रत्नागिरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. ”या राणेंनी आतापर्यंत किती पक्ष बदलले. शिवसेना सोडल्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. आता भाजपामध्ये आलेत. त्यांच्यासाठी आता फक्त रामदास आठवलेंचा पक्ष बाकी राहिलाय. राणे बघावं तेव्हा मातोश्रीवर टीका करतात. मात्र, आपली तेवढी औकात आहे का, हे त्यांनी तपासून बघावं. याच शिवसेनेच्या जोरावर नारायण राणे आणि त्यांच्या मुलाबाळांनी कोट्यवधींची संपत्ती कमावली. त्यामुळे मातोश्रीवर बोलण्याची त्यांची औकात आहे का? नारायण राणेंसारख्या व्यक्तीला ‘सूर्याजी पिसाळची अवलाद’ ही उपमादेखील कमी पडेल. नारायण राणे हा कोकणाला लागलेला काळा डाग आहे. हा डाग मी धुतल्याशिवाय राहणार नाही”. असं कदम म्हणाले होते.

नितेश राणेंनी केली कुत्र्यासोबत तुलना –
नितेश राणेंनी ट्विटरद्वारे प्रत्युत्तर देताना अप्रत्यक्षपणे रामदास कदम म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं असल्याची आक्षेपार्ह टीका केली आहे. ”स्व. मान बाळासाहेब असतील, राजसाहेब असतील यांना कुत्रे आवडतात..उद्धव ठाकरें नी पण तीच परंपरा चालु ठेवली आहे…रामदास कदम च्या रुपत!! सतत भोकत असतो..त्याला हे माहित नाही..भूकणारे कुत्रे कधी चावत नाहीत !!” असं झोंबणारं ट्विट केलं आहे.


आता नितेश राणेंच्या या टीकेला रामदास कदम काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Verbal fight between ramdas kadam and nitesh rane
First published on: 15-12-2018 at 07:40 IST