पुणे : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना ‘लोकसत्ता नवदुर्गा जीवनगौरव’ पुरस्काराने सोमवारी मुंबईत गौरविण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांत झोकून देऊन कार्य करणाऱ्या महिलांना दरवर्षी ‘लोकसत्ता नवदुर्गा’ म्हणून सन्मानित केले जाते. यंदापासून या उपक्रमाला ‘जीवनगौरव’ पुरस्काराचाही सुवर्णस्पर्श लाभत आहे.

उद्योगापासून पर्यावरणापर्यंत सर्वच क्षेत्रांत असीम कर्तृत्व गाजवलेल्या महिलांचा सन्मान करणारा ‘लोकसत्ता नवदुर्गा’ उपक्रमाचा पुरस्कार सोहळा सोमवारी (२९ ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजता दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात रंगणार आहे.

Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
loksatta tarun tejankit award
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान

विविध क्षेत्रांत भरीव कार्य करणाऱ्या महिलांचे कर्तृत्व  समाजापुढे यावे, या हेतूने ‘लोकसत्ता नवदुर्गा’ हा विशेष उपक्रम नवरात्रीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत या वर्षी नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या परिणिता दांडेकर, पनवेलच्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, आदिवासी  स्त्रियांसाठी लढणाऱ्या कुमारीबाई जमकातन, शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणाऱ्या डॉ. स्वर्णलता भिशीकर, उद्योजिका मनीषा धात्रक, अत्याचाराविरोधात लढण्यासाठी महिलांना बळ देणाऱ्या रुबिना पटेल, मनोरूग्ण महिलांना घर मिळवून देणाऱ्या डॉ. सुचेता धामणे आणि आमटे कुटुंबियांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवणाऱ्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांना नवदुर्गा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या बरोबरच यंदापासून जीवनगौरव पुरस्कारही सुरू करण्यात येत आहे. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका, डॉ. प्रभा अत्रे यांना हा पहिला पुरस्कार दिला जाणार आहे. साहित्य-संगीताची बहारदार मैफलही या सोहळ्याच्या निमित्ताने अनुभवता येईल. कार्यक्रमाला प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश मिळेल.

स्वरयोगिनी..

संगीत हाच धर्म आणि तीच भगवंताची पूजा आहे, या भावनेनं संगीताची प्रयोगशील साधना करणाऱ्या स्वरयोगिनी प्रभा अत्रे यांचं गाणं हे शास्त्रीय संगीताच्या अनेक स्वरोपासकांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरणारं आहे. संगीत ही अनंत जन्मांची साधना आहे आणि गायकानं प्रत्येक क्षण स्वरांचं बोट पकडूनच जगलं पाहिजे, या भावनेनं आजही त्यांची स्वरआराधना अव्याहत सुरूच आहे.