ज्येष्ठ समाजवादी आणि कामगार चळवळीचे नेते किशोर पवार यांचे आज (बुधवार) सकाळी सात वाजता पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.  
गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मंगळवारी रात्री त्यांची प्रकृती खालविल्याने त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. पवार यांनी अनेक लढ्यांमध्ये भाग घेतला होता. त्यांचे पार्थिव नवीपेठेतील एस.एम.जोशी फाऊंडेशनमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  
ज्येष्ठ सामाजवादी नेते जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी आणि एन. जी. गोरे यांच्याबरोबर पवार यांनी काम केले होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, हैदराबाद आणि गोवा मुक्ती मोर्चामध्येही पवार यांचा सहभाग होता.