24 October 2020

News Flash

Coronavirus : विदर्भात करोनाचे ४१ बळी

नागपूर जिल्हा वगळता उर्वरित विदर्भात करोनाने ४१ जणांचे बळी गेले.

नागपूर : नागपूर जिल्हा वगळता उर्वरित विदर्भात करोनाने ४१ जणांचे बळी गेले. त्यात अमरावती जिल्हा तीन, चंद्रपूर जिल्हय़ातील पाच, वाशीम जिल्हय़ात सहा, वर्धा जिल्ह्य़ातील तीन, यवतमाळ जिल्ह्य़ात नऊ, अकोला जिल्ह्य़ात एक, गोंदिया जिल्ह्य़ात सहा, बुलढाणा जिल्ह्य़ात चार व भंडारा जिल्ह्य़ातील चार जणांचा समावेश आहे.

यवतमाळ जिल्ह्य़ात नऊ जणांचा मृत्यू

यवतमाळ : जिल्ह्यात रविवारी तब्बल ८३० करोनाबाधितांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. अनेक दिवसांनंतर मोठय़ा प्रमाणात रुग्णांना सुट्टी मिळाल्याने प्रशासनास दिलासा मिळाला असला तरी बाधितांच्या संख्येतही झपाटय़ाने वाढ होत आहे. आज दिवसभरात नव्याने २२१ करोनाबाधित रुग्ण आढळले असून नऊ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या २०४ वर पोहोचली आहे.

वाशीम जिल्ह्य़ात सहा रुग्णांचा मृत्यू

अकोला : वाशीम जिल्हय़ातील सहा करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी १५० नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर ९८ जण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर वाशीम शहरातील चामुंडादेवी परिसरातील ४५ वर्षीय महिला, ब्रह्मा येथील ६९ वर्षीय पुरुष, शिरपुटी येथील ५५ वर्षीय महिला, रिसोड तालुक्यातील रिठद येथील ६५ वर्षीय महिला, मंगरुळपीर तालुक्यातील सोनखास येथील ६७ वर्षीय पुरुष, मालेगाव शहरातील ८५ वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्हय़ात आतापर्यंत ३५५५ करोनाबाधित आढळले असून, ८७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २६१९ करोनामुक्त, तर एक आत्महत्या धरून ६४ जणांचे मृत्यू झाले आहेत.

गोंदिया जिल्ह्य़ात सहा रुग्णांचा मृत्यू

गोंदिया : जिल्ह्य़ात रविवारी करोनाबाधित सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा अहवाल मिळालेला आहे, तर  २१५ करोनाबाधित रुग्णांची  नव्याने नोंद झाली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्य़ातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ३८७२ झाली आहे. रविवारी १३७ जण करोनामुक्त झाले. आतापर्यंत २६६२ जण करोनामुक्त झाले. रविवारी मृत्यू झालेल्यांमध्ये नवेगावबांध येथील ५८ वर्षीय रुग्ण, सोनपुरी येथील ४८ वर्षीय, गोंदिया येथील गांधी वॉर्ड येथील ८७ वर्षीय, एक ४५ वर्षीय पुरुष, देवरी येथील ४२ वर्षीय पुरुष तर बालाघाट येथील ४८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्य़ात मृत्यूची संख्या ६६ झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्य़ात पाच मृत्यू

चंद्रपूर : जिल्हय़ात रविवारी करोनाबाधित पाच जणांचा मृत्यू झाला तर २९२ नवीन बाधित मिळाले आहेत. करोनाबाधितांची एकूण संख्या ७ हजार ८१६ झाली आहे. यातील ४४८४ बाधित करोनामुक्त झाले आहे, तर ३२१८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आज मृत्यू पावलेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील ४ व्यक्ती व वरोरा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यात तुकूम परिसरातील ५९ व ५० वर्षीय दोन, वडगाव परिसरातील ४७  वर्षीय व पंचशील चौकातील ६८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे, तर वरोरा येथील ७० वर्षीय व्यक्तीही दगावला आहे.

बुलढाणा जिल्हय़ात चार मृत्यू

अकोला : बुलढाणा जिल्हय़ात चार करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले. १३७ नवे करोनाबाधित रुग्ण रविवारी आढळून आले आहेत. दरम्यान, जिल्हय़ातील १४७ जण करोनामुक्त झाले. बुलढाणा जिल्हय़ातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या नमुन्यांचे व रॅपिड टेस्टचे एकूण ४५० अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३१३ अहवाल निगेटिव्ह, तर १३७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चिखली येथील ५६ वर्षीय, मेहकर येथील ५० वर्षीय, मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील ७० वर्षीय व जालना जिल्हय़ातील टेंभुर्णी येथील ६० वर्षीय महिला रुग्ण यांचे उपचारादरम्यान मृत्यू झाले. आतापर्यंत ७४ करोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत एकूण ५८४८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यातील ४६४५ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्हय़ात सध्या ११२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हय़ातील आणखी १७४८ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत जिल्हय़ातील प्रयोगशाळा व रॅपिड टेस्ट मिळून एकूण २६०५७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

भंडारा जिल्ह्य़ात चार मृत्यू

गोंदिया : भंडारा जिल्ह्य़ात रविवारी चार करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधित रुग्ण मृत्यूची संख्या ८४ झाली आहे. तर १३६ करोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. त्यामुळे  जिल्ह्य़ातील एकूण करोनाबाधित  रुग्णांची संख्या ३८७२ झाली आहे. तर जिल्ह्यात ९० रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या २३४८ झाली असून रविवारी करोनाबाधित आलेल्यां मध्ये भंडारा तालुक्यातील ४७, साकोली ४, लाखांदूर ३६, तुमसर ९, मोहाडी ५, पवनी १२ व लाखनी तालुक्यातील २३ व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत २३४८ रुग्णांनी करोनावर  मात केली आहे. जिल्ह्यात आता करोनाबधितांची संख्या ३८७२ झाली असून यातील १४४० क्रियाशील रुग्ण आहेत.

अमरावती जिल्ह्य़ात तीन रुग्णांचा मृत्यू

अमरावती : जिल्ह्यात करोनाचा उद्रेक कायम असून रविवारी ३ रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे करोनाबळींची संख्या २३१ वर पोहचली आहे. याशिवाय ३७० नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण करोनाबाधितांची नोंद १० हजार ९६० वर गेली आहे. मृतांमध्ये अचलपूर येथील ७५ वर्षीय आणि पूर्णानगर येथील ४५ वर्षीय पुरुष तसेच वरूड येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात रविवारी सायंकाळपर्यंत ३७० नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली. करोनाबाधितांची एकूण नोंद ११ हजाराच्या जवळपास पोहचली असली, तरी ८ हजार ३८९७ रुग्ण करोनामुक्तही झाले आहेत. १६६२ करोनाबाधितांवर सध्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी ६७८ हे गृह विलगीकरणात आहेत. आज २९३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

वर्धा जिल्हय़ात तिघांचा मृत्यू

वर्धा : रविवारी जिल्हय़ात तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ११५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. आज समुद्रपूर व वर्धा येथील दोन ७२ वर्षीय पुरुष व पुलगाव येथील ७० वर्षीय महिलेचा मृत्य झाल्याने जिल्ह्य़ातील मृत्यूसंख्या ८९ वर पोहोचली आहे. तसेच आज तालुकानिहाय वर्धा ५४, देवळी १३, सेलू ७, आर्वी ९, आष्टी ४, कारंजा ६, समुद्रपूर १ व हिंगणघाटला २१ रुग्ण आढळून आले असून यात ७० पुरुष व ४५ महिला रुग्ण आहेत. सध्या रुग्णालयात १ हजार ६६८ रुग्ण उपचार घेत आहे.

अकोला जिल्हय़ात एक बळी

अकोला : जिल्हय़ात एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ९७ नवे करोनाबाधित रुग्ण रविवारी आढळून आले. जिल्हय़ातील एकूण रुग्ण संख्या ६५३२ झाली. आतापर्यंत जिल्हय़ात २०९ करोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत.जिल्ह्यातील एकूण २९९ तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २०२ अहवाल निगेटिव्ह, तर ९७ बाधित आढळून आले. सध्या १५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम येथील ५३ वर्षीय महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ४० जण आज करोनामुक्त झाले. आतापर्यंत जिल्हय़ातील ४७३२ जण करोनामुक्त झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 12:11 am

Web Title: vidarbha recorded 41 covid 19 deaths in a day zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 बरे झालेल्या एक लाख आठ हजार करोना रुग्णांची नोंदच नाही!
2 कृषी विधेयकं मंजूर झाल्याचा आनंद शिवारात गुढी उभारून व्यक्त करा – सदाभाऊ खोत
3 राज्यात २४ तासांमध्ये २० हजार ५९८ नवे करोनाबाधित, ४५५ रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X