News Flash

VIDEO : मुंबई-गोवा महामार्गावरील पूल कोसळला

घटना घडली त्यावेळी पूलावर नेमकी किती वाहने होती, याची नेमकी माहिती नाही.

या पूलावरून निघालेल्या दोन एसटी बसेस आणि सहा ते सात वाहने या दुर्घटनेनंतर बेपत्ता आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर राजेवाडी फाट्याजवळ असलेला जुना पूल मंगळवारी रात्री कोसळला. या पूलावरून निघालेल्या दोन एसटी बससह सहा ते सात वाहने यामुळे सावित्री नदीच्या पाण्यात वाहून गेली. या वाहनांचा आणि त्यामधील प्रवाशांचा अद्याप शोध लागलेला नसून, घटनास्थळी मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जवान, तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. मदतीसाठी नौदलालाही पाचारण करण्यात आले आहे. कमकुवत झालेल्या या पूलावरून वाहतूक सुरू होती. गेल्या दोन दिवसांपासून रायगडमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे हा पूल वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. हा पूल १०० वर्षे जुना असून ब्रिटीश काळात तो बांधण्यात आला आहे.
काय आहे वाहून गेलेल्या ‘महाड’ पूलाचा इतिहास?
मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्राथमिक तपासात सावित्री नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा दाब पडल्यामुळे पूल कोसळला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला, अशी शक्यता वर्तविण्यात येते आहे. घटना घडली त्यावेळी पूलावर नेमकी किती वाहने होती, याची नेमकी माहिती नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2016 10:51 am

Web Title: video old bridge on mumbai goa highway collapse
Next Stories
1 डी. वाय. पाटील संस्थेवरील छाप्यात सापडले ४० किलो सोने आणि ३० कोटींची रक्कम
2 बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाईन सुरू, एनडीआरएफची पथके घटनास्थळी
3 पंतप्रधान पीकविमा योजनेच्या हप्त्यात, संरक्षक रकमेत कपात
Just Now!
X