03 March 2021

News Flash

Vidhan Parishad Election: नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेच्या दराडेंचा दणदणीत विजय

टीडीएफमधील फाटाफुटीचा फायदा शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांना मिळाला. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संदीप बेडसेंचा पराभव केला.

Kishor Darade: विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघात टीडीएफमधील फाटाफुटीचा फायदा शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांना मिळाला.

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघात टीडीएफमधील फाटाफुटीचा फायदा शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांना मिळाला. दराडेंनी निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीचे संदीप बेडसेंचा २४३६९ मतांनी दणदणीत पराभव केला. पहिल्या फेरीपासूनच दराडेंनी बेडसे यांच्यावर आघाडी घेतली होती . विजयासाठी आवश्यक असलेला २३ हजार ९९० मतांचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण न करू शकल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. या मतदारसंघासाठी विक्रमी ९२.३० टक्के इतके मतदान झाले होते. त्यामुळे सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली होती. भाजपाचे अनिकेत पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्यात शिवसेना यशस्वी झाली.

मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर दराडे यांना सर्वाधिक १६,८८६ मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे बेडसे यांना १०,९७० मते मिळाली. भाजपाचे अनिकेत पाटील ६,३२९ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले, तर टीडीएफचे भाऊसाहेब कचरे ५,१६७ मतांसह चौथ्या क्रमांकावर राहिले. दराडे यांना सर्वाधिक मते मिळूनही विजयासाठी आवश्यक असलेला कोटा त्यांना पूर्ण करता आला नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या पसंतीच्या मतांची मतमोजणी सुरू करण्यात आली.

किशोर दराडे नुकताच विधान परिषदेवर शिवसेनेकडून निवडून गेलेले आमदार नरेंद्र दराडेंचे बंधू आहेत. तर भाजपाचे अनिकेत पाटील हे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे पुत्र आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 6:36 am

Web Title: vidhan parishad election result 2018 nashik teachers constituency shiv senas kishor darade win ncp bjp congress
Next Stories
1 ‘सुखोई’ अपघात आठवडाभरात प्राथमिक निष्कर्ष
2 जिल्ह्य़ातील १३८ शाळांचे स्वच्छतागृह वापराविना..
3 खेटे मारूनही समाधानकारक उत्तर मिळेना!
Just Now!
X