विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून शिवसेना- भाजप – राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. तानाजी सावंत यांना तब्बल ३४८ मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार शंकर बडे यांना ७८ मतं मिळाली आहेत.

यवतमाळ मतदारसंघात काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महायुतीची स्थापना केली होती. शिवसेनेचे उपनेते तानाजी सावंत यांना महायुतीतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट असलेले तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील असले तरी त्यांना यवतमाळमधून उमेदवारी देण्यात आली होती. बंडखोर उमेदवार संदीप बजेरिया यांनीदेखील सावंत यांनाच पाठिंबा दिला होता. पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ निघून गेल्याने बजेरिया यांना अर्ज मागे घेता आला नव्हता.

madhurimaraje chhatrapati
प्रचाराच्या धकाधकीत मधुरिमाराजे छत्रपतींनी क्रिकेटचा घेतला आस्वाद; संभाजीराजेंनी मारली नदीत डुबकी
maharashtra political crisis eknath shinde
चावडी : एकनाथांचा ‘उदय’ !
Despite staying in NCP Ramraje Nimbalkar group is against BJP candidate Ranjitsinh Nimbalkar
राष्ट्रवादीत राहूनही रामराजे गट भाजपच्या विरोधात
gadchiroli lok sabha seat, Minister dharamraobaba aatram, Claims, vijay waddetivar will join bjp, waddettiwar denies
विजय वडेट्टीवार यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश! धर्मरावबाबा आत्राम यांच्या दाव्याने खळबळ

यवतमाळ मतदारसंघात ४३९ मतं आहेत. यात सहा जणांनी मतदान केले नव्हते. भाजपचे नगरसेवक बंटी जयस्वाल हत्येप्रकरणी तुरुंगात आहेत. त्यामुळे त्यांनादेखील मतदान करता आले नव्हते. उर्वरित ४३३ मतांपैकी सावंत यांना ३४८ मतं मिळाली. बडे यांना ७८ तर अपक्ष उमेदवार बजेरिया यांना २ मतं मिळाली आहेत.

शिवजलक्रांती योजनेत ‘चमकदार’ कामगिरी करणाऱ्या सावंत यांना उपनेतेपद मिळाल्यानंतर त्यांचे बळ वाढले होते. उस्मानाबादमध्ये शिवजल क्रांती योजना राबवत सावंत यांनी राजकारणावरील पकड मजबूत केली आहे. आता सावंत विधान परिषदेत दाखल झाल्याने पक्षातील त्यांचे वज आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. शिक्षण आणि साखर सम्राट म्हणून ओळखले जाणारे सावंत यांच्याकडे ११५ कोटींची मालमत्ता आहे. सावंत यांचा तीन खासगी साखर कारखान्यांसह पुणे जिल्ह्य़ात इंजिनीअिरग, फार्मसी अशा विविध महाविद्यालयांचा डोलारा आहे. रियल इस्टेटमध्येही त्यांचा वावर असून पुणे येथील कात्रज परिसरात त्यांचे कॉर्पोरेट कार्यालय आहे.