News Flash

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना करोनाची लागण

करोना अहवाल सकारात्मक आल्याची दिली माहिती

गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आहे. नाना पटोले यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. “करोनाची लक्षणं जाणवू लागल्यामुळे मी माझी करोना चाचणी केली असून त्याचे अहवाल सकारात्मक आले आहेत,” अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करून घ्यावी असंही ते म्हणाले.

“गेले अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला करोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली. ती चाचणी सकारात्मक आली आहे. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये,” असं नाना पटोले म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली.

“गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची करोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच करोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन, असंही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 7:38 pm

Web Title: vidhan sabha assembly speaker nana patole tested coronavirus positive gave information jud 87
Next Stories
1 नागपूर विभागातील पूरग्रस्तांसाठी १६ कोटी ४८ लाखांचा निधी मंजूर
2 आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत राहुल तेलरांधे यांनी टिपलेल्या छायाचित्रास पुरस्कार
3 “स्टंटबाजीसाठी काहीही बोललेलं महाराष्ट्रातील माणूस खपवून घेणार नाही”
Just Now!
X