अधिवेशनासाठी एक्स्प्रेस रेल्वेने मुंबईला येणाऱ्या आमदारांच्या बॅगांवर चोरांनी डल्ला मारला आहे. सोमवारी देवगिरी एक्स्प्रेमध्ये शिवसेनेच्या दोन तर आज मंगळवारी राहुल बोंद्रे यांना चोरांनी लुटले आहे. याबाबत लोहमार्ग पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानाकावर सोमवारी आमदाराच्या पत्नीची पर्स चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. विदर्भ एक्स्प्रेसमध्ये बुलढाण्यातील चिखली मतदार संघातील आमदार राहुल बोंद्रे यांच्या पत्नीची पर्स चोरीला गेली आहे. याप्रकरणी सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अधिवेशनासाठी येताना मुंबईला येताना चोरांनी आमदारांच्या सामनाची चोरी केली. त्यानंतर कल्याण स्थानकावरून राहुल बोंद्रे यांच्या पत्नीची पर्स घेऊन चोर पसार झाला. आमदार राहुल बोंद्रे यांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोर पळून गेला. पर्समध्ये २६ हजारांची रोख रक्कम, एटीएम कार्ड आणि महत्वाची कागदपत्रे होती.

सकाळी सहा वाजता विदर्भ एक्स्प्रेस कल्याण स्थानकावर आल्यानंतर ही घटना घडली आहे. राहुल बेंद्रे यांच्या पत्नीने तात्काळ मध्य रेल्वेच्या सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांत याबाबतची तक्रार दिली आहे.

अधिवेशनासाठी विशेष असणाऱ्या बोगीमधून चोरी झाल्यामुळे राहुल बोंद्रो, शशिकांत खेडेकर आणि संजय रायमुलकर यांनी सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.