14 December 2017

News Flash

विधानसभेत गदारोळ; कामकाज बारा वाजेर्यंत तहकूब

कामकाजाला सुरूवात होतात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी 'आघाडी सरकार हाय हाय' अशा घोषणा देण्यास सुरूवात

नागपूर | Updated: December 11, 2012 11:25 AM

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला काल प्रचंड गदारोळात सुरूवात झाल्यानंतर आज दुस-या दिवशीही तीच परिस्थिती पहायला मिळाली. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सभागृहात उपस्थित पाहताच विरोधकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर कामकाजाला सुरूवात होतात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ‘आघाडी सरकार हाय हाय’ अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. दरम्यान, अध्यक्ष वसंत पुरके यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी पुन्हा जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली.
नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी शिवसेना सदस्यांना उददेशून, ‘मुंबईतील मराठी शाळा बंद पडत आहेत, तुम्ही मराठीची गळचेपी करत आहात’,  असा आरोप केल्यामुळे सभागृतला गोंधळ आणखीनच वाढला आणि अध्यक्षानी कामकाज बारा वाजेपर्तंत तहबकूब केले. 

First Published on December 11, 2012 11:25 am

Web Title: vidhimandal adjourned till noon
टॅग Vidhimandal