येथील जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सहायक संचालक विद्या साहेबराव शितोळे यांचे निलंबन झाले असून त्यांना ठाणे येथील १ लाख रुपयांच्या लाचेचे प्रकरण भोवले. निलंबनाच्या आदेशाबाबत मात्र कमालीची गुप्तता पाळली जात होती.
ठाणे तालुक्यात सहकारी संस्था उपनिबंधक पदावर (द्वितीय श्रेणी) विद्या शितोळे कार्यरत असताना त्यांनी कुरेशी यांच्याकडे दि हरमिटेज को. ऑ. हौ. सोसायटीचे दप्तर तपासणीचा चांगला अहवाल देण्यासाठी व सध्याची सोसायटीची कमिटी बरखास्त न करण्यासाठी साडेतीन लाखांच्या लाचेची मागणी केली होती. या लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये १४ फेब्रुवारी २०१३ रोजी ठाणे येथील कार्यालयात स्वीकारण्याचे मान्य केले होते. या लाचेच्या रकमेमध्ये विद्या शितोळे यांचा २५ टक्के सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्याविरुद्ध २ जानेवारी २०१४ रोजी ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विद्या शितोळे यांना ४ जानेवारी रोजी अटक झाली. ७ जानेवारी रोजी त्यांची जामिनावर मुक्तता झाली. शितोळे ४८ तासांपेक्षा अधिक कालावधीकरिता न्यायालयीन कोठडीत होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.
यामुळे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात अहरण व संवितरण अधिकारी नसल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. त्यामुळे कर्मचारी आíथक अडचणीत सापडले आहेत.

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ