News Flash

संभाजीराजे व उदयनराजेंच्या भेटीवर वडेट्टीवारांनी केलं ट्विट, म्हणाले…

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे व उदयनराजे यांच्या भेटीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं, अखेर आज ही भेट पुण्यात झाली.

ओबीसी कोणत्याही समाजाविरुद्ध लढाई लढत नसून स्वतःच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करत आहे, असं वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे.

सर्वोच्च न्यायायाच्या निर्णयानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण तापल्याचं दिसत आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमकम भूमिका घेत, राज्य सरकारला अल्टिमेटमही दिलेला आहे. एवढच नाही तर त्यांनी आंदोनलानाच इशारा देत त्यानुसार राज्यभर दौरा देखील सुरू केलेला आहे. दरम्यान, आज या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांची पुण्यात बैठक पार पडली. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेली ही भेट पार पडल्यानंतर, त्यावर आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“दोन्ही राजे मराठा समाजासाठी एकत्र आले याचा आनंद आहे. समाजाच्या हक्कासाठी आंदोलन करणे त्यात काही गैर नाही. मराठा समाजासोबतच दोन्ही राजेंनी ओबीसींच्या हक्कासाठी सुद्धा पाठिंबा द्यावा सहकार्य करावे ही विनंती.” असं विजय वडेट्टीवार यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

तसेच, “महाराष्ट्रातील प्रत्येक ओबीसी आज आपल्या हक्कांबद्दल जागरूक आहे, आपले हक्क प्राप्त करण्यासाठी एकत्रित येऊन आवाज बुलंद करत आहे याचा अभिमान आहे. प्रत्येक गाव पातळीवर ओबीसींच्या हक्कांसाठी राबणारे हात असणे आवश्यक असून त्यासाठी ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकणे अत्यंत गरजेचे आहे. असं वडेट्टीवार यांनी या अगोदर पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलेलं आहे.

Maratha Reservation: राज्याने धाडस करावं; केंद्राचं मी बघतो – उदयनराजे भोसले

याचबरोबर, “ओबीसी कोणत्याही समाजाविरुद्ध लढाई लढत नसून स्वतःच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करत आहे. राज्यातील ओबीसी चळवळीतील सर्व नेत्यांनी आपल्या बंधूजनासाठी एकजूट व्हावे.” असं आवाहनही विजय वडेट्टीवारांनी केलेलं आहे.

लोणावळ्यात ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी दोन दिवसीय शिबीर –

ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी २६ आणि २७ जून रोजी लोणावळा येथे दोन दिवसीय शिबीर होणार आहे. या शिबिरात राज्यातील २५० प्रतिनिधी सहभागी होतील आणि त्यामध्ये अनेक मुद्यावर चर्चा केली जाणार आहे. या दोन दिवसीय शिबिरात ओबीसी समाजातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी सहभागी होण्याची गरज असल्याचे आवाहन मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. तसेच, त्यांनी ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, यातून समाजाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी मागणी देखील केलेली आहे.

…तर आमच्यावरही हल्ला करताना थांबणार नाहीत; संभाजीराजेंच्या भेटीनंतर उदयनराजेंचं वक्तव्य

दरम्यान आज, पुण्यात दोन्ही राजेंमध्ये मराठा आऱक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाल्यानंतर, त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. संभीजीराजे यांनी यावेळी दोघांमध्ये बहुतांश मुद्द्यावर एकमत झाल्याचं सांगितलं. तसंच उदयनराजे यांनी यावेळी उद्या आमच्यावरही हल्ला होईल अशी वेळ येऊ शकते असंही बोलून दाखवलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 9:43 pm

Web Title: vijay wadettiwar tweeted about the meeting between sambhaji raje and udayan raje said msr 87
Next Stories
1 सातारा : खंबाटकी घाटात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह!
2 महाबळेश्वर-पाचगणीतील पर्यटकांची गर्दी ‘मॅप्रो’ला पडली महागात; प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई
3 स्वबळाचा नारा देणाऱ्या नाना पटोलेंना अजित पवारांनी फटकारलं; म्हणाले…
Just Now!
X