नगरमधील लढतीने पवार-विखे यांच्यातील राजकीय संघर्ष तिसऱ्या पिढीत सुरू झाला होता. पवार यांनी डॉ. सुजय यांच्या विरोधात अनेक बैठका, सभा घेतल्या. विखे यांच्या विरोधी पवार यांनी मोहीम उघडल्याने भाजपा नेते त्यांच्या मदतीला धावून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगरला, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याच्यासाठी दोन सभा घेतल्या. ही निवडणूक पवार विरुद्ध विखे अशी झाली. त्यात विखे यांनी दणदणीत विजय मिळवला. नगर लोकसभा मतदार संघात १९९१ माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे यांचा पवार यांनी पराभव घडवून आणला होता. त्याचा बदला विखेंचे नातू डॉ. सुजय यांनी घेतला.