ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनअंतर्गत येणाऱ्या मामलाच्या जंगलात बुधवारी संन्यासी मलय्या नैताम (५५) याच्यावर बिबटय़ाने हल्ला करून त्याला जागीच ठार केले. बिबट व वाघाच्या हल्ल्याची २० दिवसांतील ही तिसरी घटना असून यंदा २० जण ठार झाले आहेत. मामला गावातील संन्यासी मलय्या नैताम हा रात्री गाय घरी परत आली नाही म्हणून सहकाऱ्यांसह जंगलात शोधण्यासाठी गेला. जंगलात गेल्यानंतरही गाईचा ठावठिकाणा लागला नाही. मात्र झुडपात लपलेल्या बिबटय़ाने नैतामवर हल्ला करून त्याला ठार केले.