News Flash

वांद्रे गर्दी प्रकरण : अटकेत असलेल्या विनय दुबेच्या भावाची पोलीस संरक्षणाची मागणी

समाजमाध्यमातून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप

संग्रहित छायाचित्र

वांद्रे गर्दी प्रकरणी अटक असलेल्या विनय दुबेच्या भावाने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. समाजमाध्यमातून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्याने केला असून आमच्या जीवाला समाज कंटकापासून धोका असल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

टाळेबंदी असताना वांद्रे स्टेशनवर गर्दी जमवण्यास कारण असल्याच्या आरोपाखाली उत्तरभारतीय महापंचायत संघटनेचा अध्यक्ष विनय दुबे याला रबाळे पोलिसांनी नुकतेच अटक करून बांद्रा पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्याला २१ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली मात्र या प्रकरणाचा आता वेगळेच वळण लागले असून अटक आरोपी विनय याचा भाऊ अभय दुबे याला समाजमाध्यमातून धमकीवजा भाषा वापरून मजकूर टाकला जात आहे. अश्लाघ्य भाषा वापरली जात आहे असा आरोप करीत अभय याने कुटुंबाच्या संरक्षणाची मागणी पोलिसांच्या कडे केली आहे. या बाबत नुकतेच त्यांनी हा प्रकार लेखी पत्राद्वारे पोलिसांना कळलेलं आहे. या बाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला.  घडलेली घटना मन सुन्न करणारी असून यात विनाकारण भावाला अटक करण्यात आले आहे. या प्रकरणी आम्हाला नक्कीच न्याय मिळेल या बाबत शंका नाही मात्र त्या नंतर आम्हाला समाज माध्यमातून धमकी वजा बोलले जात असून आम्ही कुटुंबीय भीतीच्या सावटाखाली आहोत पोलिसांनी आम्हाला संरक्षण द्यावे ही विनंती करीत आहोत असेही त्यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 11:27 pm

Web Title: vinay dubeys brother demands police protection abn 97
Next Stories
1 रेशनची दुकानं रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार; छगन भुजबळ यांचे आदेश
2 Coronavirus : मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले 245 कोटी रुपये
3 Coronavirus : दिवसभरात विरार शहरात १० नवे रुग्ण
Just Now!
X