बुलडाणा जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊनगर करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ही मागणी केली आहे. नामांतर केलं नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. जालना येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

विनायक मेटे यांनी म्हटलं की, ‘येत्या 12 तारखेला राजमाता जिजाऊ यांची जयंती असून याच पार्श्वभूमीवर सरकाराने बुलडाणा जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊनगर करावे. सरकारने नामकरण केलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन उभारु’. यावेळी त्यांनी मंत्रीपद न मिळाल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली.

आम्ही मंत्रीपदाची वेळोवेळी मागणी करुनदेखील सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने सरकारविरोधात आमची नाराजी असल्याचं त्यांनी सांगितलं.