News Flash

पंढरपुरात ‘व्हीआयपी दर्शन पास’ विक्रीचा प्रकार

दर्शनाचा काळाबाजार, एकाविरुद्ध गुन्हा

पंढरपुरात ‘व्हीआयपी दर्शन पास’ विक्रीचा प्रकार

दर्शनाचा काळाबाजार, एकाविरुद्ध गुन्हा

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमधील वाद संपण्याची लक्षणे नाहीत. आता व्हीआयपी दर्शनाचा पास तयार करून दर्शन करणाऱ्या भाविकांकडून ८०० रुपये घेऊन फसवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कैलास डोके यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणामुळे दर्शनाचा काळाबाजार पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे.

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि वाद हे एक समीकरण झाले आहे. या आधी मंदिर समितीच्या व्यवस्थपकास मारहाण आणि काळे फासण्याची घटना घडली. तर कर्मचाऱ्यांमध्ये दर्शनाला सोडण्यावरून हाणामारी झाली होती. अगदी आषाढीच्या तोंडावर मंदिर समितीच्या सदस्याने मंदिर कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली होती. तर आषाढी यात्रा कालावधीत लाडू विक्री केल्यावर पैशांचा भरणा समितीकडे केला गेला नाही. या साऱ्या घटनेनंतर समितीने संबंधितावर कारवाई केली. अशा घटना पुढे घडणार नाहीत, असे जाहीर केले न केले तोच पुन्हा हा प्रकार घडला आहे.

हैदराबाद येथील श्रीनिवास प्रसादराव पिठे व त्यांची पत्नी लक्ष्मी श्रीनिवास पिठे हे दर्शनासाठी पंढरपूर येथे ३० ऑगस्टला आले होते. या वेळी कैलास डोके यांनी या दाम्पत्याला झटपट दर्शन करून देतो म्हणून त्यांच्याकडून ८०० रुपये घेतले. या दाम्पत्याला डोके याने ‘व्हीआयपी’ पास मिळवून दिला. मंदिराच्या ‘व्हीआयपी’ गेटमधून जाताना पोलिसांनी चौकशी केली. या वेळी या पासविषयी अधिक चौकशी केली असता त्याच्या विक्रीचा प्रकार उघड झाला. या बाबत ३० तारखेला उशिरा रात्री पोलीस नाईक वामन पोपट यलमार याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि कैलास डोके याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे मंदिरातील दर्शनाचा काळाबाजार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. मंदिर समितीने केवळ तात्पुरती कारवाई न करता याबाबत ठोस कारवाई करावी, जेणेकरून मंदिर समितीची बदनामी होणार नाही, अशी मागणी भाविकांतून होत आहे.

अपप्रवृत्तीला पाठीशी घालणार नाही – ढोले

‘व्हीआयपी’ दर्शन पास विक्रीचा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून योग्य ती करावी करावी. या पुढे मंदिर प्रशासन अपप्रवृत्तीला पाठीशी घालणार नाही. तसेच यापुढे अशी काही घटना घडली, तर प्रशासन कडक कारवाई करणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 1:29 am

Web Title: vip pass in pandharpur
Next Stories
1 सिडकोच्या अध्यक्षपदाची माळ प्रशांत ठाकूर यांच्या गळ्यात, म्हाडाच्या अध्यक्षपदी उदय सामंत
2 कार चालवताना तरूणाला हार्ट अॅटॅक, वाहतूक पोलिसाने वाचवले प्राण
3 देशात हिटलरशाहीच, धर्माच्या नावावर जीव घेण्याचे प्रकार चालणार नाही: खरगे
Just Now!
X