26 September 2020

News Flash

विश्वास नांगरे पाटील यांची नाशिक पोलिस आयुक्तपदी बदली

विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीमुळे नाशिक शहरातील गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा बसल्याचं बोललं जात आहे

कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे विश्वास नांगरे पाटील यांची बदली झाली आहे. नाशिक पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांची बदली झाली असून लवकरच ते पदभार स्विकारणार आहेत. नाशिक पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

रवींद्र सिंघल यांच्या नियुक्तीबद्दल मात्र अद्याप कोणती माहिती मिळालेली नाही. रवींद्र सिंघल आणि विश्वास नांगरे पाटील दोघेही धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. अनेक तरुण दोघांना आपला आदर्श मानतात. स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करणारे अनेक तरुण विश्वास नांगरे पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. मूळचे सांगली जिल्ह्याचे असणारे विश्वास नांगरे पाटील यांनी खडतर प्रवास करत यश मिळवलं आहे. याचा अनेकदा त्यांनी आपल्या भाषणातही उल्लेख केला आहे. स्पर्धा परिक्षेसाठी अनेक तरुणांना ते मदतदेखील करतात.

दरम्यान कोल्हापूर परिक्षेत्र महानिरीक्षकपदी असणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी प्रकाश मुत्याल यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विश्वास नांगरे पाटील यांची आतापर्यंतची कारकिर्द –
– लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक
– अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक
– पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
– मुंबई पोलीसदल उपायुक्त
– ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
– अप्पर(अतिरिक्त -) पोलीस आयुक्त, मुंबई पश्चिम विभाग
– पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 10:53 am

Web Title: vishwas nangre patil transfered to nashik police commissioner
Next Stories
1 यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण
2 आणखी साडेचार हजार गावांत दुष्काळ जाहीर!
3 रायगडमध्ये एसटीत बॉम्ब
Just Now!
X