कोकण रेल्वेमार्गावरचा प्रवास कोणत्याही ऋतूत, विशेषत: पावसाळ्यात डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. प्रवाशांना कोकणातील निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी मध्य रेल्वेच्या ताफ्यातील ‘व्हिस्टाडोम’ कोच कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणार आहे. दादर- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला हा डबा जोडण्यात येणार असून या डब्यातून दादर ते रत्नागिरी प्रवासासाठी १,४८० रुपये तर दादर ते मडगावसाठी २,२३५ रुपये मोजावे लागतील.

काचेचे छत असलेली पहिली ट्रेन विशाखापट्टणम ते आराकू व्हॅली या हिल स्टेशन दरम्यान धावत आहे. अशा प्रकारचा एक डबा प्रायोगिक तत्त्वावर मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या डब्याची बांधणी ही चेन्नईतील रेल्वेच्या इंटिग्रल कोच कारखान्यात करण्यात आली. कोकण रेल्वेवरील जनशताब्दी एक्स्प्रेसला हा डबा जोडावा असा प्रस्ताव मध्य रेल्वेने दिला होता. या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे. १८ सप्टेंबरपासून हा डबा जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर आठवड्यातील पाच दिवस ही ट्रेन धावणार आहे.

two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
Mumbai, stolen mobile phones,
मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक
CIDCO has extended Navi Mumbai Metro timings following passenger demand
प्रवाशांच्या मागणीनंतर सिडकोने नवी मुंबई मेट्रोची वेळ वाढवली
रेल्वे सुसाट…! गेल्या वर्षभरात साडेपाच कोटी प्रवासी अन् फुकट्या प्रवाशांना २७ कोटींचा दंड

काचेचे छत असलेली पहिली ट्रेन विशाखापट्टणम ते आराकू व्हॅली या हिल स्टेशन दरम्यान धावत आहे. युरोपात अशा प्रकारचा डबा असलेल्या ट्रेन चालवण्यात येत असून त्याच धर्तीवर भारतातही ट्रेनला असा डबा जोडण्याचा निर्णय तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला होता. चार विस्टाडोम कोच उभारण्यासाठी रेल्वेला ४ कोटींचा खर्च आला आहे.

काय आहेत डब्याचे वैशिष्ट्य ?
डब्यात ४० सीट्स असून त्या १८० टक्के रोटेबल आहेत. काचेच्या मोठ्या खिडक्या, १२ एलसीडी, एक फ्रिज, एक फ्रीजर, एक ओव्हन, एक ज्युसर ग्राईंडर, प्रवाशांच्या सामानासाठी जागा, निसर्ग पाहण्यासाठी स्वतंत्र जागा या डब्यात आहे.

‘पारदर्शक’ प्रवासाचे दर किती?
‘व्हिस्टाडोम’ कोचमधील तिकिटांचे दर रेल्वेने जाहीर केले आहेत. दादर ते चिपळूणपर्यंत १,२१५ रुपये, दादर ते रत्नागिरीपर्यंत १,४८० रुपये, दादर ते कणकवलीसाठी १,८७० रुपये, दादर थिवीमसाठी २,१२० रुपये आणि दादर ते मडगावसाठी २,२३५ रुपये मोजावे लागतील. रेल्वे आरक्षण केंद्र तसेच ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावरुन ‘व्हिस्टाडोम’ कोचसाठी बुकिंग करता येईल.