17 February 2019

News Flash

विठ्ठलाचा ‘कॅनव्हास’रूपी जयघोष!

विठ्ठलाच्या भक्तीचे अनोखे रंग औरंगाबादच्या चित्रप्रदर्शनात दिसून आले

विठ्ठल आणि रूक्मिणी अवघ्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत! आषाढी एकादशी मंगळवारी साजरी होणार आहे, मात्र औरंगाबाद शहरात आषाढीचा उत्सव आणि उत्साह कॅनव्हासवर उतरल्याचे दिसून येते आहे. औरंगाबादच्या तापडिया नाट्यमंदिराच्या कलादालनात सध्या विठ्ठल रूक्मिणीची वैविध्यपूर्ण चित्रे ठेवण्यात आली आहेत. या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातूनच विठूमाऊलीचा जयघोष करण्यात येतो आहे.  या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभतो आहे. vitthal
‘हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा’ या आशयाचे चित्रप्रदर्शन तापडिया नाट्यमंदिराच्या कलादालनात भरवण्यात आले आहे. औरंगाबाद शहरातल्या उमंग ग्रुपतर्फे हे आगळेवेगळे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. बेटी बचाओ, चिमणी वाचवा या आशयाची प्रदर्शनं भरविल्यानंतर आता विठ्ठलाच्या चित्रांचे प्रदर्शन या ग्रुपतर्फे भरविण्यात आले आहे. विठ्ठलाची भक्ती कॅनव्हासवर चितारण्याची ही वेगळीच संकल्पना राबवण्यात आली आहे. विठ्ठलाशी संबंधित २६ वैविध्यपूर्ण चित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची आणि कलारसिकांची गर्दीही होते आहे.
vitthal2
विठ्ठल रूक्मिणी यांच्या दर्शनाने पावन होण्याचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी. वारकरी दिंड्या-पताका घेऊन महिनाभर आधीच पंढरीची वाट पायी चालत मार्गस्थ होतात, तर आळंदीतून ज्ञानेश्वर महाराज आणि देहूतून तुकाराम महाराजांचीही पालखी पंढरपूरला पोहचते. टाळ-मृदुंगाचा गजर आणि माऊली माऊलीचा जयघोष अशा भक्तिच्या रंगात वारकरी तल्लीन झालेले बघायला मिळतात. याच भक्तिरंगाचा धागा घेऊन औरंगाबादमध्ये विठ्ठल रूक्मिणीच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

First Published on July 3, 2017 8:56 pm

Web Title: vitthal canvas painting exhibition in aurangabad